Posts

Showing posts from July, 2018

मध्यमवर्गीय माणसाचे मनोगत

मध्यमवर्गी माणसाचे मनोगत मनातले प्रश्न विचारू मी कोणाला सोयरसुतक एकमेकांचे नाही ह्या जगाला दबून जगण्यात इथे जन्म माझा गेला डोके वर करता शिरच्छेदच झाला गुंडांची गुंडगिरी राजकारण्यांची दडपशाही बेसुमार महागाई जगण्यात राम राहिला नाही नवी पिढी वेगळ्याच विश्वात असे दंग बेफिकीर वागणे रोजच्या जगण्याचे अंग सुशिक्षित म्हणणारे सर्रास तोडतात नियम समजावयास जाता साद घालतो यम उदंड झाले धंदे अन् शिक्षणाचे वांदे पडलेले खांदे नामर्द झाले समदे बदलण्यास ही स्थिती विश्वास हवा नवा पृथ्वीवर लवकरच शिवाजी राजा यायला हवा अतुल दिवाकर

आयुष्यरुपी भेळ

आयुष्यरूपी भेळ मानवाचे आयुष्य जणू चित्रपटाचा खेळ चांगल्या वाईट घटनांची ही आहे छान भेळ छोट्या छोट्या कुरबुरी एक महत्वाचे अंग आयुष्यरूपी भेळेचे जणू कुरकुरीत भडंग थोडासा अबोला आणि मग मनधरणी दुराव्याच्या तिखटावरचे हे आहे गोड पाणी नात्यांमधील दुरावा म्हणजे मिरचीचा ठेचा हा फक्त नावाला कटुता नको टिकायला हिरवीगार कोथिंबीर देई तिखट भेळेला थंडावा नात्यांमधे तसाच प्रेमरस असावा विसरू कसे फरसाण भेळ बनवी चटकदार पत्नी आणि दोस्त जीवनाचे जोडीदार ह्यात भरले ओतप्रोत अनेक रंग अनेक रस सगळ्यांचे आहे महत्व अथवा आयुष्य होईल नीरस अतुल दिवाकर

गुपित

जेव्हापासून आलो पृथ्वीवर जणू काही शर्यतच सुरू झाली जीवघेण्या ह्या स्पर्धेत जगण्याची मग मजाच गेली । लहानपणीचे परावलंबी जीवन वागणे इतरांच्या मनाप्रमाणे अन्यथा मग मिळे शासन स्वत्वासाठी रोजच झगडणे । मित्रांसोबत काही घटका होता उशीर मिळे फटका दिन ते गेले ठेउनी आठवण मनात माझ्या आठवणींची साठवण । मंतरलेले दिवस आले वेगळेच विश्व मला दिसले जमिनीवर जरी असलो तरंगावयाचे गुपित कळाले । अतुल दिवाकर

भावना

ठरवले एकदा की काढावा एक दिवस सानिध्यात आपण आपल्याच भावनांच्या पुरवावे जरा आपलेच सोस अन् झुलावे थोडे हिंदोळयावर मनाच्या जावे उंच आनंदाबरोबर होउ दे हलके हलके शरीर फुलपाखरासारखे अनेक रंग लेउन खुशीत व्हावे दंग पडद्याआडून हळूच डोकावे लपत छपत मनातील भिती कोणी कोणा किती छळावे अति तेथे होते माती फुरंगटून बसला कोपर्‍यात चिडका बिब्बा जाउन दूर पाहता पाहता सगळ्यांचा अचानक बदलून गेला नूर ह्या सगळ्या गोंधळात शांत एकदम होता ध्यानस्थ अस्वस्थ होते इतर सगळेजण हा होता मजेत स्वस्थ किती हे रंग अन् किती ही रूपे ह्यांना पाहून मन हरपे म्हटले तर अवघड आणि म्हटले तर सोपे सांभाळ करण्यास मनाचे कप्पे अतुल दिवाकर

सत्य

सत्य जन्म आणि मृत्यू न चुकणारा फेरा मानवा अडकलास तू सोडवेना मायेचा पसारा मायेचे पाश अन् भावनेची बंधने धडधडणार्‍या हृदयात नात्यांची स्पंदने करून घेतोस तू आपलीच आपण ससेहोलपट जीवनाला आपल्या जणू समजतोस चित्रपट हीच आहे वेळ आणि हाच तो क्षण समजून घे तुझ्या असण्याचे कारण मोहमायेकडे नको ठेउ आयुष्य तुझे तारण तुझा कठोर निग्रहच करेल षड्रिपूंचे हरण अडकशील जर या कलियुगातील पाशात कसा मग फिरशील स्वच्छंदी अवकाशात चक्रव्यूह हा दे तोडून एकदाचा अन् घे अनुभव असीम शांततेचा अशाश्वत जीवन समजून घे हे सत्य पृथ्वीवरील प्रत्येक, जीव आहे मर्त्य नामस्मरण ह्यातून तारून नेईल तुला अनुभवाचे बोल आहेत संतांचे हे मुला अतुल दिवाकर

जगण्याचे उद्दिष्ट

जगण्याचे उद्दिष्ट मला कधी कधी प्रश्न पडतो की आपल्या जगण्याचे उद्दिष्ट काय. आपण पृथ्वीवर का आलो. येथे येऊन आपण काय साध्य करणार आहोत. ना आपण आपल्या मर्जीने येतो ना आपल्या मर्जीने जातो ( अर्थात आत्महत्या करणारे सोडून ). मग आपल्याला येथे धाडण्याचे प्रयोजन काय. काल सिंधूताई सपकाळांची जीवनगाथा त्यांच्याच तोंडून ऐकायचे भाग्य लाभले. एक बाई असून माईने, हो त्यांना माई म्हणलेलं आवडतं. तर त्या माईने जे साध्य केले आणि अजूनही काही उद्दीष्टे साध्य करायचा त्यांचा जो अविरत प्रयत्न करीत आहे ते ऐकून मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. ती खरचं माऊली आहे. माया , उदारता आणि लीनता याचे मूर्तिमंत उदाहरण. त्यांनी सांगितलेल्या काही प्रसंगात त्यांच्याजागी जर एखादा पुरूष असता तर त्याचा निभाव लागला असता असे मला वाटत नाही. त्याने केव्हाच गाशा गुंडाळला असता. मला सांगा ना, समोर प्रेत जळत असतांना त्यावर आपले जेवण तुमच्या माझ्यासारख्या माणसाने केले असते का? आणि जरी एखादा तेवढा धीट असता तरी त्याने एकट्याने त्या अंधार्‍या स्मशानात ते खाल्ले असते का? प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असे प्रसंग येतात की त्याला दुसर्‍याच्या ...

नवरा बायको

नवरा बायको नवरा आणि बायको दोन चाके संसाराची चर्चा ही मुळीच नको कोणाची बाजू महत्वाची नवरा झटतो घर बनवतो बायको देते घराला घरपण ऐका तुम्हाला म्हणून सांगतो घरासाठी हवेत दोघेही जण कष्ट करतो पैसा कमावतो घरासाठी सोय करतो उन्हातान्हात थंडी पावसात मागे नाही पडत कष्टात सर्वांची करते सतत काळजी स्व ला विसरून चिंता इतरांची सुखी असेल जर नवरा मुले चेहर्‍यावर मग हसू फुले जोडी ही आहे दोघांची कोणी एक नाही मोठा तुम्हाला आहे विनंती माझी चर्चेला ह्या तुम्ही द्यावा फाटा अतुल दिवाकर

जग हे सुंदर आहे

जग हे सुंदर आहे अजूनही टिकून आहे माणसातील माणुसकी नात्यामधे गोडवा अजूनही आहे बाकी मनाला करतो प्रसन्न पहाटेचा गारवा तरूण हातात अजूनही दिसतो बघ पावा ऐकू येतात अजूनही कबीराचे दोहे खात्री मग पटते, खरचं जग हे सुंदर आहे । धडपडताना दिसतं कोणीतरी दुसर्‍यासाठी निसर्गावर प्रेम करतं जीवापाड लोकांसाठी ओले होतात डोळे अजूनही बघून वाट  पंक्तिमधे बसायला अजूनही दिसतो पाट नाश्त्याला आवर्जून मिळतात कांदेपोहे खात्री मग पटते, खरचं जग हे सुंदर आहे । वेगळ्या वाटा चोखाळते आनंदाने तरूणाई आई गाते बाळासाठी अजूनही अंगाई दाखवतात कधी मुले अफलातून हुशारी कर्तृत्व ते बघून थक्क होते दुनिया सारी आजच्या जगात कर्तृत्वाला मान मिळतो आहे खात्री मग पटते, खरचं जग हे सुंदर आहे । अतुल दिवाकर

सोक्षमोक्ष

सोक्षमोक्ष शिक्षणाची अवस्था आज कशी झाली शिकूनही अडाण्यांची भाऊगर्दी झाली निरर्थक चर्चांमधे बुद्धीची चुणुक दाखवावी शिकून आम्ही अशी उंची गाठावी ? शिकून सवरून आता गणित बदलले गरजेचे माणसाच्या जीवनापेक्षा महत्व जास्त मृत्युच्या चर्चेचे । जाणारा जातो त्याचे दुःख कोणा मिडिया नावाचा इथे आहे एक बडगा ठरवाल तसे तो रंग आणेल घटनेला ऐकणारे, बघणारे दोष द्यावा तरी कोणाला । विचारवंतांची फळी जणू गायबच झाली उथळ झाले शिक्षण, फळे भोगा त्याची टिळक, आगरकर, सावरकर, गोखले हे सर्व जणू आता इतिहास जमाच झाले । कुठे चालले जग, देवा तुला तरी माहीत आहे ? का हे असे होणे ही तुझीच मर्जी आहे तुला आता करतो एवढी एकच विनंती सोक्षमोक्ष लाव बाबा, कारण अति तेथे माती । अतुल दिवाकर

समाधान

समाधान माणसाचा संघर्ष काही केल्या थांबत नाही आल्यापासून जाईपर्यंत कष्ट काही संपत नाही कितीही मिळाले तरी समाधान काही होत नाही समजावून सांगितले पण कळाले तरी वळत नाही । कळणार कधी तुला इप्सित जीवनाचे कधी होईल समाधानी जीवन मानवाचे कसे थांबेल चक्र मानवा विफलतेचे का हवे आहे तुला काही मंत्र सफलतेचे । अंथरूण पाहून पाय पसरावे कष्टाचे जीवन मानवा तू जगावे ऐकावे जनाचे करावे मनाचे मिळाले ते आनंदाने घ्यावे । खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी तुपाची जणू खाणच आहे तुझ्यापाशी होशील का सुखी तू राहून अधाशी विचारांमधे परिपक्वता आण जराशी । तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार अंतर्मुख होउन जरा विचार कर एकवार काखेत कळसा अन् गावाला वळसा भानावर ये रे मानवा जरासा । अतुल दिवाकर

ओळख

ओळख गवताच्या पात्याची लवचिकता खोल जाण्याचा स्वभाव मुळांचा देवा ! होईल का अशी माझी मानसिकता मनाला होईल का स्पर्श गुणांचा । विशालता नभाची वा भरारी गरूडाची चिकाटी मधमाश्यांची आणि शिस्त मुंग्यांची बनेल का असा माझा स्वभाव का राहिल जीवनात ह्यांचा अभाव । निरपेक्षता झाडांची अन् चपळता हरिणांची कठिणता धातूंची, वाहती वृत्ती वार्‍याची नको पडायला कमतरता, आयुष्यात ह्या गुणांची वरदान देशील का देवा ! घेशील का काळजी सर्वांची । विचार जेवढा करतो मी माझेच मला कळून चुकले नाही कोणात ह्यांची कमी अंगिकारेल तो ज्याने हे ओळखले । अतुल दिवाकर

कायापालट

कायापालट तुमची एक मनापासून दाद किंवा पाठीवरची हलकी थाप पुरेशी आहे मला जीवनाशी लढायला मागे उभे आहात हेच खुप आहे जगायला येवोत आता कितीही संकटे अथवा वाटू दे मला एकटे उभा राहिन जिद्दीने मी आता नाही कसलीच कमी नको मला कुणाची मेहेरबानी कशाला हवी आश्वासने नवनवी माझा आहे विश्वास माझ्यावर बळ मिळाले माझ्यावरील विश्वासावर कायापालट केला तुम्ही आव्हानांशी लढीन मी आयुष्याला टक्कर देउन नवी क्षितीजे गाठीन मी अतुल दिवाकर

काॅर्पोरेट जग

काॅर्पोरेट जग मलाही वाटतं सोडून घड्याळाचे चक्र आणि ए सी चा गारवा भटकावे मनसोक्त निसर्गात बनून पारवा नको तो लॅपटाॅपचा स्क्रीन आणि आकडेमोड बनावे परत लहान मूल अन् काढावी मुलांची खोड मलाही चालेल गरगर फिरणार्‍या गुबगुबीत खुर्चीपेक्षा आवडेल मला बसायला झाडावर चढून पडलो, धडपडलो तरी नाही अपेक्षा टाकावे म्हणतो आज सारे मॅनर्स गाडून मलाही आवडेल कंटाळवाणे पाॅवर पाॅईंट मधील भरजरी सादरीकरण आणि ERP मधील अनेक अहवाल थोडे करावे म्हणतो नात्यांचे नूतनीकरण आणि द्यावी म्हणतो जरा आयुष्याला चाल मजा येईल नको तो ध्येय गाठायचा रोजचा तणाव आणि न गाठल्याची वाटलेली निराशा आवडेल जर मिळाला खेळायला मुलाबरोबर एक बुद्धिबळाचा डाव आणि केला हारल्यावर मी थोडा तमाशा मला आवडेल नको त्या चौकोनी चेहर्‍याच्या आॅफिसातल्या बैठका आणि बैठकीतले तेच ते साचेबद्ध संवाद हवी मला दोस्तांबरोबरची रंगलेली महफिल अन् फुटकळ विनोदावरची भरभरून दाद पण काय करणार काॅर्पोरेट जगातील प्यादी आपण सगळी कोणाच्या न् कोणाच्या तालावर नाचणार केली जरी कल्पना वेगळी तरी मनातले मांडे मनातच जिरणार अतुल दिवाकर

आरोग्य

आरोग्य आभासी जगातील आभासी नाती स्पर्शाची महती समजतील किती आभासी भावना शब्दांचा खेळ कसा साधावा जीवनात ताळमेळ एका क्लिकवर मिळतो पुस्तकांचा खजिना साद घालतो मला वाचनालयाचा जिना ग्रंथालयातील खजिना आनंद देतो E-book नव्हे तर मी पुस्तकांमधेच रमतो झटक्यात मिळते विदेशातील  E mail ख्याली खुशाली आता पटकन कळेल लोकांची किती छान सोय ही झाली पत्राची वाट पहायची हुरहुर मात्र लोपली घरबसल्या selection घरबसल्या खरेदी दुकानदारा बरोबर हक्काची कसली आता नाती Cell वरून यादी अन् घरपोच सामान आजच्या जगातला Trend हा महान वापरा मोबाईल अन् जा त्याच्या आहारी सवय आता लागली, काय करणार स्वारी मोजा पैसे अन् आरोग्य घ्या विकत डाॅक्टरचा फेरा आता नाही चुकत समजून हा इशारा व्हाल जर शहाणे गॅझेट्सची वजाबाकी अन् जंक फुड उणे जवळ करा मैदान ठेवा रोजचे चालणे निरोगी रहाल, नियमित ठेवाल जर धावणे अतुल दिवाकर

विलक्षण

विलक्षण किती बरे छान होईल जर घड्याळ मागे करता आले ज्याकडे मी दुर्लक्ष केले ते जर मला परत शिकता आले ऐकून न ऐकलेले बाबांचे सल्ले, कानाडोळा केलेल्या आईच्या सूचना परत एकदा अनुभवीन आज्जीची माया, मनावर घेईन मी दोस्तांच्या भावना । छोट्या छोट्या गोष्टींमधून मिळणारा आनंद मनात असून न जोपासलेला आवडता छंद ऐकीन मन लावून वसंतरावांचे घेई छंद मकरंद सवाई गंधर्वच्या गायनात होईन मी धुंद । पावसाची पहिली सर घेईन मी अंगावर गरम गरम चहा आणि कांदा भजी त्यावर निसर्गाच्या सानिध्यात तान घेईन सुस्वर मनसोक्त भटकेन आनंदात डोंगरावर । थंडीच्या दिवसात शेकोटीसमोर बसेन दोस्तांच्या महफिलीत मी पण असेन गप्पा गोष्टीमधे मग रात्रसुद्धा संपेन आनंदाच्या क्षणांना कसे मी विसरेन । सणांची येईल एक मज्जाच वेगळी नातेवाईक मंडळी परत जमतील सगळी मोठी मोठी माणसे होतील मग लहान घालतील गोंधळ सणाला येईल जान । लिहीता लिहीता एक गोष्ट झाली विलक्षण घड्याळ नाही गेले मागे पण अनुभवले मी ते क्षण शरीराने मी वर्तमानातच राहिलो पण मनाने मात्र भूतकाळात गेलो । अतुल दिवाकर

वीर योध्दा

गरूड टीमचा कमांडो शैलभ गौर पठाणकोटला दहशतवाद्यांशी लढतांना पोटात सहा गोळ्या घेउनही लढत राहिला. सध्या तो ICU मधे आहे. पण लवकरच बरा होउन बाहेर येईल. वीर योध्दा भरपूर आत्मविश्वास आणि जबरदस्त इच्छाशक्ती अलोट  देशप्रेम आणि जबरदस्त देशभक्ति देशाचा सुपुत्र शैलभ तू शोभतोस शौर्याने लोकांचे डोळे दिपवतोस । अभिमान वाटतो आम्हाला आमच्यात आहेस तू तू असतांना कसा सफल होईल दुश्मनांचा हेतू बघून तुझे धैर्य त्यांना बसते धडकी हताश होउन ते,  आपटतात त्यांची डोकी । बेधडक पोटात झेलल्यास तू गोळ्या  जणू काही त्या गालावरच्या खळ्या नजर होती समोर नाही रडत बसलास दहशतवाद्यांना संपवून मगच थांबलास । सलाम आहे तुला आणि तुझ्या मातेला पोटी जन्म दिला तिने तुझ्यासारख्या सुपुत्राला तुझ्यासारखे जवान असता नाही आम्हां भिती गर्वाने सर्व भारतीयांची फुलली आहे छाती । अतुल दिवाकर 9.1.16

निर्णय

निर्णय शहरातले डांबरी रस्ते लोकांचे जीव किती सस्ते गाडीतून आनंदात फिरतात श्वान अन् माणसांना रहायला फुटपाथचा मान जगणे घड्याळ्याच्या काट्यावरती रोजचीच होते दमछाक पुरती सिमेंटचे जंगल आणि बाटलीतले पाणी विज नसेल तर आणिबाणी प्रत्येकाचे असते स्वतःचे विश्व तोंडदेखली नाती अन् भावना शुष्क कमाई मोजतात पैशामध्ये माणसाची किंमत कवडीमध्ये । गावाकडे माझ्या पायवाटीचा रस्ता आपला वाटतो, येउन बघ दोस्ता जनावरांना मिळतो माणसाचा मान सर्जा आणि राजाची वेगळीच शान गळ्यात घुंघुरमाळा अन् शिंगांना रंग पाहून त्या दोघांना होशील तू दंग वरूणराजावर मात्र सर्वांची भिस्त रागावला तो तर जीवन होते स्वस्त लई जीव लावते माझी काळी माय गाईच्या दुधाची जाड जाड साय मातीची घरे आहेत शेणाने सारवलेली घरातली माणसे भावनेने ओथंबलेली आनंदात करतो इथे प्रत्येकजण कष्ट एकमेकांवर माणसे नाही होत रूष्ट जरूरीपुरतीच किंमत पैशाला नात्यात किंमत असते भावनेला । एकीकडे पैसा तर दुसरीकडे नाती आरामदायी जीवन वा कष्ट अती ठरव तूच गावाकडे जायचे का शहरात माणसाला माणसासारखे वागवायचे । अतुल दिवाकर

बीज

बीज बरेच झाले उपदेशाचे डोस आता कृती झालीच पाहिजे ज्ञानात भर तर रोजच पडते आचरणात ज्ञान आणलेच पाहिजे । माहित असते चुकीचे खातो खा खा ही थांबवली पाहिजे सुटलेले पोट किंवा काळवंडलेले ओठ माणसाने नाहीतर बाळगले पाहिजे । चुकीचा दिनक्रम अनुसरत असतोस फळे त्याची भोगलीच पाहिजेत नाहीतर करून शिस्तीचे पालन आरोग्याची घडी बसवली पाहिजे । मनाची शांती विसरतोस वेड्या दुर्लक्षाचे परिणाम सोसलेच पाहिजेत अथवा ऐकून मनाचे सांगणे जीवन आनंदी केले पाहिजे । पैसा पैसा करून तू कमावलेस काय विचार कर अशाश्वत गोष्टीच्या मागे लागून पुण्य कमावयाच्या संधी विसर । भर तारूण्यात झालास म्हातारा बनवलेस स्वतःला पापाचा घडा जेव्हा येईल हाती काठी तेव्हाच का तू शिकणार आहेस धडा । कळले असेल जर सार तुला शुभस्य शीघ्रम लाग कामाला जेव्हा बदलशील तू स्वतःला बीज सुखाचे रोवलेस मुला । अतुल दिवाकर

असे होते पुणे

असे होते पुणे चौसोपी वाडे होते, वाड्यापुढे परसबाग प्राजक्ताचा सडा अन् कोंबड्याची बांग देवळातील काकडआरतीने यायची जाग झाडांची होती रेलचेल वड,पिंपळ आणि साग नव्हते काही उणे एकेकाळी असे होते पुणे रस्ते होते छोटे आजूबाजूला झाडी होती सातनंतर कोथरूडला जायला वाटायची भिती एकटे जावे लागले तर धडधडायची छाती डांबर होते कमी अन् रस्त्यावर होती माती नव्हते काही उणे एकेकाळी असे होते पुणे चालत चालत जायची शाळेमध्ये मुले फक्त काहीजणांच्या हाती सायकल खुले जाई, जुई, मोगरा, चाफा होती बागेत फुले वडाच्या झाडांना सणात लागायचे झुले नव्हते काही उणे एकेकाळी असे होते पुणे गणेशोत्सव होता पुण्याची शान चतुशृंगीच्या जत्रेत खेळायची मुले लहानसान दुचाकीच्या शहरात होता टांग्याला मान अॅम्बॅसिडर होती श्रीमंतांची जान नव्हते काही उणे एकेकाळी असे होते पुणे लंगडी, खो खो, चोर पोलीस हे होते खेळ रस्त्यावर वाहतुकीचा होता ताळमेळ चटकदार पदार्थ म्हणजे होती भेळ सर्वांचे आवडते फळ म्हणजे होते केळ नव्हते काही उणे एकेकाळी असे होते पुणे ओळखले जायचे हे पेन्शनंरांचे शहर हिवाळ्यात असायचा थंडीचा कहर होती पु...

जाणीव

अकस्मात आकाशात एक वीज चमकून गेली घोर काळोख्या अंधारात प्रकाशाचा किरण सोडून गेली अंधाराला चिरत किरण निघाला अंनंताकडून अनंताकडे दाट अंधारात उमटले प्रकाशाचे एक कडे। माणसा! तुझ्या आयुष्यातील अंधारात जर हवा आहे तुला प्रकाशाचा किरण विजेसारखा चमकायला हवा तुझाच हात अन् ठेवायला हवे तू आयुष्य तारण । कोणीतरी बदलेल आपले नशीब चुकीची आहे तुझी ही प्रतिक्षा बदल आहे बघ तुझ्या समीप संपवशील जेव्हा तू तुझी तितिक्षा । तुझ्या आजमध्येच दडलाय उद्या कळेल तुला तेव्हा होईल पहाट अनभिज्ञ राहिलास डोळे मिटून चालतच राहिल आयुष्याचे चर्‍हाट । अतुल

शत्रू

शत्रू शत्रू असतो आपणच आपले पण आपल्याला हे कळतच नाही अहं आपला आड येतो हे कळूनही आपल्याला वळतच नाही । साध सोपं असतं गणित अवघड ते आपणच करतो Face value वर घेत नाही दोष हा आपलाच असतो । घटनेकडे बघण्याचा आपला दृष्टीकोन conditioned असतो त्यामुळेच कदाचित सरळ मार्ग आपल्याला मग तिरका भासतो । कदाचित होतील गोष्टी सोप्या ज्या otherwise वाटतात अवघड जर तर चा विचार टाळून घातली नाही विचारांची सांगड ।  अतुल दिवाकर

चेहरा आणि मुखवटा

चेहरा आणि मुखवटा मुखवट्यामागून हळूच चेहरा एक दिसला मुखवटा होता क्रोधित, चेहरा खुदकन हसला कोणाला कोण लपवत होते प्रश्न मला पडला आपापल्या परीने दोघेही प्रयत्न करत होते चांगला । जगामधे वावरायला मुखवटा करतो धारण चेहरा लपवायचे काय बरे कारण ? तरीसुद्धा नेहमी असेच करतो आपण चेहर्‍याला नेहमीच, ठेवतो आपण तारण । मनाचे प्रतिबिंब चेहर्‍यावर उमटते भावनांचे द्वंद्व सगळयांना कळते मुखवटा म्हणूनच का चेहर्‍याला झाकतो मन कळू नये असा प्रयत्न तो करतो । काय होईल मधेच जर मुखवटा पडला गळून मनातले भाव जगाला येतील कळून योग्य आहे हे असे नाही का तुम्हां वाटत मनापासून सांगितले तर का नाही पटत । टाकून द्या मुखवटा करा चेहराच धारण नक्कीच होईल तो तुमच्या समाधानाचे कारण नका करू मुखवट्याचे लाड विनाकारण करा मुखवट्याचे हरण अन् जा चेहर्‍याला शरण । अतुल दिवाकर

सांगा कसं जगायचं?

पाडगावकरांची क्षमा मागून. सांगा कसं जगायचं? सगळीकडे प्रदूषण अन् आकाशात धुरांचे लोट चला हवा येउ द्या म्हणत निलेश हसवतो लोटपोट नाकावर हात ठेउन रडायचं का पोट धरधरून हसायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं । रस्ते गेले वाहनांनी भरून अन् चालायला सुद्धा जागा नाही आपल्या लोकांच्या हृदयात मात्र अढळ स्थान आपलं सही रस्त्यावरच्या गर्दीला नाक मुरडायचं का आपल्या लोकांच्या हृदयात घर करायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं । ऑनलाईनचा जमाना घरबसल्या करा कामे सगळी किंवा लोकांना भेटण्यासाठी गाठा रांगेची वाट वेगळी डोळे चोळत आणि तब्येत बिघडवत जगायचं का चालत पळत तब्येतीत रहायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं । जमाना स्पर्धेचा , एकमेकांच्या पुढे जायचा जमाना नाविन्यतेचा वेगळा वाटा चोखाळायचा आपल्या मुलांना स्पर्धेत ढकलायचं का त्याच्या धाडसाचं कौतुक करायचं तुम्हीच ठरवा कसं जगायचं । अतुल दिवाकर

संवाद आणि भावना

संवाद आणि भावना दोघांचा चालला होता वाद एक होती भावना अन् दुसरा संवाद प्रश्न होता कोण श्रेष्ठ कनिष्ठ कोण आणि कोण ज्येष्ठ । भावना म्हणाली माझ्याकडे बघ अरे! मी आहे म्हणून आहे हे जग माणूस असो वा असो जनावर मी आहे म्हणून त्यांचे जगणे खरोखर । एकटा असू दे किंवा असू दे अनेक माझा सर्वत्र वावर नेक कधी डोळ्यातून कधी स्पर्शातून व्यक्त व्हावयाचे मार्ग कित्येक । माझ्याविना शुष्क नाती मी अनेकांची जीवनसाथी तुझा सांग बरं काय उपयोग मानवाला कसा होईल सहन माझा वियोग । हे ऐकून ,संवाद हळूच हसला म्हणाला अर्थ नसलेला हा वाद कसला अगं तुझ्यामुळे का कोणी जगला तुझ्यावर जो विसंबला तो इथे फसला । बघ ना, आईचेच असतात शब्द जे घडवतात बाळाला छान प्रेयसीला वाटतात प्रियकराचे I love you हे शब्द महान । उदास असो वा असो आनंदी अडकलेला अथवा असो स्वछंदी भावना कळवायला प्रत्येकाला शब्दच हवेत आहे की नाही जग माझ्याच समवेत । तिढा हा सुटणं खरेच आहे क्लिष्ट तुम्हाला काय वाटतं कोण आहे ज्येष्ठ माझ्यासाठी आहेत दोघे समसमान एक आहे श्रेष्ठ तर दुसरा महान । अतुल दिवाकर

मकसद

मकसद रम्य अशा संध्याकाळी दिनकर जाई क्षितिजावरी पाखरे किलबिलती वृक्षांवरी लगबग असे जाण्या घरी । तू असा का बसलास दुःखी होउन डोळे ओले करून आणि मन मारून माणूस कधी जगू शकतो का हातावर हात ठेउन कसं फुलणार आयुष्य अशी उमेद घालवून । अरे ! बहर संपला की कोमेजतात फुले पण परत परत बागा फुलतातच ना निसर्गाचे हे चक्र आहे मित्रा ! तू पण थोडे समजून घे ना । चांगल्या बरोबर थोडे वाईट जगरहाटीचा नियमच जणू आनंदाला दुःखाचा संग नको नको अशा भावना ताणू । तू कोण, मी कोण आपण इथे का आलो कधीतरी कर विचार, काय होईल जर आपण नसलो जग चालायच थांबणार आहे थोडीच ते का म्हणणार आहे ... टाईम प्लीज । चल, घे भरारी आणि पसर पंख नजर ठेव गरूडाकडे, विसर विषारी डंख तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद हाच होऊ दे तुझा आता जगण्याचा मकसद । अतुल दिवाकर

स्वागत नववर्षाचे

स्वागत नववर्षाचे जीवन आपले प्रवाही करा सळसळते आयुष्य हाच आनंद खरा जीवनात सतत उत्साह धरा प्रत्येक दिवस साजरा करा । गेलेल्या दिसांचे दुःख आता विसरा येते दिवस आणतील आनंदाचा झरा फाजील उत्साह मात्र नक्की आवरा येईल मग सुख समाधान घरा । येणार आहे आता नवीन वर्ष घेउन दोन्ही दोन्ही हातांनी हर्ष कमी होईल सामान्य माणसांचा संघर्ष होणार मानवतेला प्रेमाचा स्पर्श । चला उठा कामाला लागा माणसाला द्या माणुसकीचा धागा प्रेमाने विणून टाका या संपूर्ण जगा नका रिकामी सोडू इंचभरही जागा । अतुल दिवाकर

विश्वास

विश्वास सागराच्या लाटेवरून मृतदेह आला तरंगत येउन तो किनार्‍यावर विसावला बघून ते दृश्य, काळीज हेलावले आपल्या लेकरांचे प्रताप पाहून, देवा ! तुझेसुद्धा डोळे असतील ना पाणावले । ह्यांच्यासाठी वसवलीस का देवा तू वसुंधरा मानवांना धाडलेस पृथ्वीवर देउन संस्कार खरा आज तेच कसे उठले एकमेकांच्या जीवावर जनावरे बरी, कसा ठेउ विश्वास माणसावर । माणुसकीचा एकच धर्म देवा तू सांगितला माणसाने स्वतःसाठी धर्माचा बाजार मांडला अनेक धर्म अनेक जाती, माणूस यातच अडकला स्वार्थापोटी बघ आज माणूस माणुसकीला विसरला । कोठे जाउन तू संपवणार आहेस हे चक्र का माणूसच संपवेल मानवजात समग्र त्या वेळेची का तू वाट पहात आहेस का ही परिस्थिति बघून यायलाच घाबरतो आहेस । तुला म्हणतो आम्ही देव त्याची ठेव जरा बूज हवेतर करा देवांनो आपापसात करा तुम्ही हितगूज पण यावर पक्का मार्ग आता काढायलाच हवा देवपणावर लोकांचा परत विश्वास बसवायला हवा । अतुल दिवाकर

राग

राग राग, जसा मला येतो तसाच तुम्हालाही येत असणार जसा मी ह्याच्या आहारी जातो तसेच तुम्हीही नक्कीच जात असणार । राग, का बरं हा येतो बर्‍याच वेळा मला हा प्रश्न पडतो कितीही ठरवले नको नको तरी येउन मनात घर करतो । राग, जसा तो तुमच्यावर असतो तसा कधी स्वतःवरही येतो चांगले नाही माहित असूनही लबाड पिच्छा सोडत नसतो । राग, परिस्थिती, उशीर वा मनाविरुद्ध गोष्ट अनाहूत पाऊस वा एखादी व्यक्ति खाष्ट अगदी एवढेसे सुद्धा, कारण याला पुरते याच्या आगमनामुळे मनःशांती ढळते । राग, इतर भावनां बरोबर थोडा हाही हवा सर्व रस जेवणामधे, तसा जीवनात हा हवा एवढी तुम्ही काळजी घ्या, जीवन सुखी करा नका याच्या जाऊ आहारी, हाच मंत्र खरा । अतुल दिवाकर

मस्तराम

मस्तराम मी मस्तराम जगतो आनंदात रोजचा दिवस घालवतो सुखात करत नाही चिंता ना करतो गडबड कशाला हवी धांदल अन् उगीच बडबड । जे मिळते पदरात ते समजतो माझे नाही मला हाव जे आहे दुसर्‍याचे उठतो सकाळी आनंदात, झोपतो सुखाने अनुभव हा माझा तुम्ही पण घ्या आवडीने । आहे एकच छंद, चांगले वागण्याचा माणसाला, माणूस म्हणून वागवण्याचा दुसर्‍याच्या दुःखात दुःखी होण्याचा न मागता दुसर्‍याला आनंद देण्याचा । तुमच्यात पण आहे, एक मस्तराम ओळखा त्याला नका करू रामराम देईल तो तुम्हाला समाधान खात्री आहे माझी व्हाल सुखी तुम्ही, नक्कीच ह्या जगी । अतुल दिवाकर

मन

मन मन हे माझे फुलपाखरू झाले भावनांचे रंग पंखात भरले मन झाले तळे, पाणी त्यात आले निचरा न होता भाव साचून राहिले मोकळ्या वार्‍यावर, फिरून मन आले टाकून आले ओझे, हलके हलके झाले आनंदाचे गुपित, त्याचे त्यालाच कळाले गोष्टी विसरून गेले, कसे सुखी मग झाले मन सिंह झाले कधी, डरकाळ्या हाय हाय कधी लपून बसले ... शंखातील गोगलगाय किती रूपे तू रे घेशी, जरा मला सांग मना तुझ्या रूपा रूपात आहे एक छानसा गोडवा मन माझे सज्जन, नाही दुर्गुणांचा गंध आपणच त्याने घातले स्व ला सगुणाचे बंध जरी सोडले बेलगाम नाही नाही उंडारले गुरूच्या पायापाशी त्याने स्वतःला ठेवले अतुल दिवाकर

मी कामगार

मी कामगार, दिवस रात्र करतो कष्ट, हटत नाही मागे कष्ट हेच माझे जीवन, जोडती संसाराचे धागे पोटात दोन घास जाताच सार्थक होई कष्टाचे नाही काही मोठी आस, नको बंगले मजल्यांचे मी कामगार, आपत्तींचा डोंगर जरी उभा समोर मार्ग काढतो ठेउन, विश्वास मी स्वतःवर नाही रहात अवलंबून मी इथे कोणावर जगण्याचा हाच, मंत्र ठेवतो समोर मी कामगार, जगतो मी आजमध्ये चिंता नाही उद्याची उद्या कोणी बघितला,पर्वा कशाला भविष्याची सुखी समाधानी मी जरी जिंदगी साच्याची हसतो श्रीमंतांच्या डोळ्यात बघून लकेर काळजीची मी कामगार, मर्म बापा जगण्याचे समजले का कोणाला सार आयुष्याचे समजवायचे आपणच आपणाला पृथ्वीवर हरेक जण आहे बघ कामगार प्रत्येकालाच आहेत कष्ट आणि यातना अपार अतुल दिवाकर

भेट

भेट भेट, किती छान शब्द दोन अक्षरी हरवलेल्यांना एकत्र आणणारी आसुसलेल्यांना आनंदी करणारी आणि टाळणार्‍यांना ठकवणारी भेट, म्हटलं तर एखादी दृश्य वस्तू नाहीतर येतेस माझ्यासमोर तू प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विचारात कसेही असले तरी घर करते मनात भेट, कधी तिची आठवणच आनंदी करणारी कधी नुसतीच आठवणीत राहणारी कधी धुंदी चढवणारी तर कधी खाडकन धुंदी उतरवणारी भेट, आवडत्या व्यक्तिंची हवी हवीशी अन् नावडत्या लोकांची नको नकोशी म्हटलं, तर खूप वेळ घेणारी वा कितीही वेळ दिला तरी कमीच, असं वाटणारी भेट, कजाग माणसांचा मतलब साधणारी तर कधी काहीच साध्य न करणारी मला मात्र भेट हवी आहे अशी जी भेटवेल मला माझ्यातलाच स्वतःशी । अतुल दिवाकर

आधार

आधार असावं कुणीतरी शब्द डोळ्यातले वाचणारे हात हातात घेउन, बुडतांना वाचवणारे एक तरी खांदा हवा डोके टेकवायला हो पुढे बिंधास्त,म्हणेल की मी आहे वाचवायला माझा आनंद दिसतो त्याला मी न दाखवता होतो तो दुःखी, मला दुःख होता भावनांच्या झोक्यामध्ये माझ्याबरोबर झोका घ्यायला खरचं, हवा एक खांदा मला आधार द्यायला आवडेल मला त्याच्याबरोबर माझं मन मोकळं करायला सांगायला मनाच्या कोपर्‍यातील, गोष्टी चार दडवलेल्या समजून घेईल मनःस्थिती जो अन् नाही तो उपदेश द्यायला खरचं, हवा एक खांदा मला हक्क दाखवायला करेल जो जागे, सुषुप्तितून मला चैतन्यमयी करेल जो निचेत अशा जगण्याला ज्याच्यामुळे अर्थ येईल आयुष्याला खरचं, हवा एक खांदा मला आधार द्यायला जेवढा करतो विचार तेवढे मला कळले आधाराचे गुपित तर माझ्यातच दडले मीच तो जो देणार आधाराचा खांदा आत्मविश्वास ठेवा अन् आनंदाने नांदा अतुल दिवाकर सुषुप्ति - गाढ झोप, निस्वप्न निद्रा निचेत - बेशुद्ध

फक्त तु

फक्त तु माझे हृदय मी तुला गं कधीच केले send अन् स्वागतासाठी तुझिया उभा होउन bend तू टाळिलेस मजला अन् झालो मी विवर्ण हसून तू पाहता मज भासे लोह ही सुवर्ण। जसे खोंड आईविना गं बोकाळे माळावरी तद्वत् चित्त हे माझे नसे गं थार्‍यावरी देशील का मज हर्ष,जसा श्रावणातील दैवार पिपासा नसे अर्णवाची, आनंद असे मिळता हिमतुषार । अतुल दिवाकर विवर्ण - फिका पडलेला, रंग गेलेला खोंड - गाईचे वासरू ( पुल्लिंगी ) बोकाळणे - सैरावरा धावणे दैवार - थोड्या वेळासाठी आलेला पाऊस पिपासा - तहान, तृष्णा अर्णव - महासागर

चारोळी

चारोळी चार भिंती वर छप्पर दुनियेच्या नजरेत हेच घर माझ्या मनातलं घर खरतर भावनेच्या ओलाव्यातले नाते सुंदर । --------------------------------- शब्द नव्हे तर स्पर्श बोलतात मनातील भावना नजरेतून कळतात जखम एकाला अन् दुःख दुसर्‍याला भावनिक नाते यालाच तर म्हणतात । ----------------------------------- जरी शांत माझे नयन तरी मनात आणीबाणी अबोल माझी प्रिती समजून घेशील का साजणी निजध्यास तुला बघण्याचा जन म्हणती यास विपायण निजगूज मम अंतरीचे घायाळ करती तव नयनबाण अतुल निजध्यास - छंद विपायण - वेडेपणा म्हणतात स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही मला तर वाटते लोक बरळतात काही बाही स्वर्गासाठी जर माणूस पडायला हवा गार तर जगणे म्हणजे काय नरकाचे द्वार । ----------------------------------- वार्‍याच्या लहरीवरून तरंगत शब्द आला डोळ्यातून थेट हृदयाला जाउन भिडला हृदयाची वाढवली धडधड त्याने प्रेम म्हणतात मला , म्हणाला आनंदाने । ----------------------------------- आयुष्याचं रहाटगाडगं गोल गोल फिरतं जिथून होते सुरवात, आयुष्य तिथेच संपत माहित असूनदेखील लालसा सुटत नाही निरर्थक जगल्यामुळे आयुष...

मन माझे

मन मन माझे कसे वागते सतत आपल्याच तोर्‍यात असते मी सांगतो बस शांत अशांत होउन सैरभैर फिरते । किती किती समजावले त्याला तर म्हणते कळतच नाही मला मी एका, तर ते दिशेला दुसर्‍या गुंडाळून टाकते आशा सार्‍या । मी आता पक्के ठरवले माझे मला मीच समजावले ह्याच्या भानगडीत नाही पडायचे काहीही करू पण मनाला नाही समजावयाचे । ठरवले ठेवावे नियंत्रण स्वतःवर प्रवास आहे थोडा खडतर ज्याचे आकर्षण ते थांबवणे अवघड काबूत ठेवायला खुपच जाते जड । इरादा पक्का तर मिळणार यश थोडे अवघड पण मन होईल वश आशिर्वाद गुरूंचा आणि प्रयत्न स्वतःचे गमक आहे हेच यशाचे । अतुल दिवाकर

तू

तू तू कशी, तर तप्त उन्हातील गार झुळूक असावी तशी दिसत नसूनही जाणवणारी एका क्षणात आनंद पसरवणारी तू कशी, तर शेकोटीची ऊब थंडीमध्ये असावी तशी दूर असलो तरी डोळ्यांना जाणवणारी जवळ असलो की आधार देणारी तू कशी, पूर्वेच्या उगवणार्‍या सुर्यबिंबासारखी जर दिसली नाहीस तर बेचैन मन आणि तुझ्याचमुळे आहे आनंदी जीवन तू कशी, पौर्णिमेच्या चंद्रासारखी कुठेही असलो तरी मनाला शांत करणारी जीवनरूपी अमावस्येचा अंधार दूर करणारी अतुल दिवाकर

माय मराठी

माय मराठी माझी माय मराठी, आहे मला अभिमान तिने वाढविले मला, दिले अनेक सन्मान तिच्या कुशीत शिरून माझा दिवस जातो छान माझी माय मराठी खरेच आहे खूप महान मी तिचा सान सोशिक माझी माय काना मात्रा उकार शिकेपर्यंत वाट पहाय मी एक प्राणी मला दिले तिने नाव अक्षर ओळख झाली वाढला माझा भाव अक्षराचे वाक्य, वाक्याचे निबंध झाले तिच्यामुळेच मला बक्षीस देखील मिळाले रंगविल्या तिने चर्चासत्रे अन् सभा तिच्यामुळेच ह्या जगात मी ठाम उभा ठेव अशीच सदा कृपा आम्हावरी तू माय कृपावंत मी लेकरू तुझे तुझी स्तुती गाय चिरकाल तू असणार अंतापर्यंत जगाच्या कृतज्ञ तुझा मी ह्या भावना अंतरीच्या अतुल दिवाकर

विनंती

विनंती लोकांनी मला या कितीतरी छळलं सरळ माझा स्वभाव नाही त्यांना कळलं मी पडलो साधा मला कपट नाही कळलं जिवंतपणीच मला ह्या लोकांनी जाळलं जाऊ कुठे मी माझीच घेउन राख माझ्यापेक्षाही हे लोक आहेत चलाख राखेलासुद्धा ते करतील बेचिराख मी कोण, ह्या जगालाच हे करतील खाक मायबाप सरकार ते ही उलटले मदत करू म्हणत नेते मागे हटले गरीबाला इथे नाही कोणीच वाली बदलेल नशीब आशेवर पिढी संपून गेली कोणावर मी आता ठेवावा भरवसा संपून गेले अश्रू झाला जीव वेडापिसा वाळून गेले रक्त राहिले प्राणहीन शरीर देवा तू तरी आता देशील का मला धीर सर्वस्व गमावलेला शेतकरी अतुल दिवाकर

प्रेमगीत

प्रेमगीत उलगडत गेले सारे मज गुपित गं प्रेमाचे नयनात तुझिया मजला दिसे द्वार अपुल्या विश्वाचे तू हसता मजला भासे जिंदगीचे सगळे फासे आज्ञेत चालती माझ्या गुलामच असती जसे मोहकता तुझ्या चेहर्‍याची वाढवे खोडसाळ बट केसांची अन् हृदयी फुलता वसंत डोलती फुले प्रेमाची गोडवा अपुल्या नात्याचा जणू चंद्रच तो पुनवेचा जोडी तुझी न् माझी मी चंद्र तू चांदणी शुक्राची अतुल दिवाकर
बर्डस् व्ह्यू झाडाच्या फांदीवर बसला होता पक्षी डोळयात दिसत होते अनेक घटनांचा तो साक्षी ज्याला आपण म्हणतो, बर्डस् व्ह्यू तसा अनेक घटनांचा त्याने घेतला होता रिव्ह्यू माणसां माणसांमधले दंगे मारामार्‍या विषण्ण करत होत्या त्याला अशा घटना सार्‍या एकमेकांच्या जीवावर उठलेली माणसे बघून त्यांना त्याची गळून पडती पिसे बघून राजकारणार्‍यांची कपटनिती त्याची सतत धडधड करत होती छाती बघण्याशिवाय काहीच नव्हते त्याच्या हातात दुःख झाले त्याला बघून ही हलकट जात पावसाचे रौद्र रूप बघून तो गारठला काहीच करता येत नाही म्हणून दुःखी झाला जमीनदोस्त होत होती माणसांची घरे डोळ्यादेखत त्याच्या वाहून जात होते सारे ह्या सर्वावर त्याने काढला एक उपाय ठरवले कोणालाही करायचा नाही अपाय म्हणाला कशाला पक्षी मी झालो उडलो नसतो तर कदाचित असतो सुखी झालो अतुल दिवाकर
ज्ञान हवेची एक झुळुक दबकत दबकत आली मनाला हलकेच स्पर्शून गेली थोडासा आनंद दुःख थोडेसे बरोबर घेऊन आली बघ कसे हसून म्हणाली का रे तू शांत बागडायचे सोडून का शोधतोस एकांत चल माझ्याबरोबर तुला जग दाखवते दुःख म्हणजे काय व्याख्याच बदलते मी बघितले जग म्हणून तुला सांगते हा क्षण आपला जगला तोच ज्याला हे कळते अतुल दिवाकर
खळबळ जर म्हटले तर आहे शिक्षा अथवा झोळीत घालेल भिक्षा जे सर्वांना परिचित आहे त्याला म्हणतात वाट पहाणे कळत नाही काय करावे थांबावे का निघून जावे का मनातल्या मनात चरफडत रहावे अन् परिस्थितीवर चिडून जावे दोष द्यावा तरी कोणाला प्रत्येकास हा अनुभव आला ज्याने अनुभव कामी लावला आनंद त्याने इतरांस दिला वेळ मोकळा पण मनात गोंधळ वाटे सर्व कारभार भोंगळ कळेना किती काढावी कळ खळबळ खळबळ नुसती खळबळ अतुल दिवाकर
अपघात एक असा अपघात हवा हवासा वाटणारा रोज रोज घडू दे मनाला आनंद देणारा ऑफिसमधून घरी जाता ट्रॅफिकजॅम नाही रस्त्यात घडू दे की देवा रोज असा अपघात घरी जेव्हा मी येईन गॅजेट्स नाही घरात एकमेकांशी बोलतांना संध्याकाळ जाई आनंदात आपणहून पहाटे मुले उठू दे सत्यात प्रत्यक्ष करू दे व्यायाम नाही बरं का स्वप्नात माझ्यातलाच मला भेटीन का मी रोज नवीन घेउन एक पहाट उत्साहात निःसंकोच अतुल दिवाकर
प्रवास दगड आणि विटांनी बांधतात इमारत घर हवे असल्यास हवे माणसांमधे एकमत असतील सर्वांची जर तोंडे दहा दिशांना विसरा एकोपा मावळल्या सर्व आशा थोडेसे चिडणे थोडे काॅम्प्रमाईज असे जर वागाल तर ठराल वाईज थोडे पकडा थोडे सोडा आयुष्याचा वाडा आनंदी करून सोडा मंत्र हा आहे सुखाचा तुमच्या आमच्या आनंदाचा विसरा आता प्रवास दुःखाचा प्रवास करा समाधानी आयुष्याचा अतुल दिवाकर
भावना सरळ असतो रस्ता वेडीवाकडी वाट आयुष्यरूपी रस्त्यावर भावनांचा थाट वळणे घेण्यास भाग पाडती आयुष्यामध्ये भावना असू दे मग कितीही सरळ जगायची कामना कधी वर कधी खाली आयुष्यातील चढउतार कधी तीक्ष्ण कधी बोथट भावनांमुळे धार तरी देखील सांगतो नका राग त्यांचा करू अहो त्यांच्यामुळेच तर पळते हे आयुष्याचे तारू नसत्या भावना आयुष्यात आयुष्य झाले असते नीरस त्यांच्यामुळेच आयुष्य चवदार अन् त्यात अनेक रस अतुल दिवाकर
द्विचरण पेल्यातील नीर जीवन, ढगफुटीमुळे मरण दुःखदायक स्वैराचार, आनंदास संस्कार कारण । अर्थ : तहानलेल्याला पेल्यातून पाणी दिले जाते तेव्हा त्याची तृष्णा भागते. मरणासन्न व्यक्तिस पाणी जीवनदायी ठरते. तेच पाणी ढगफुटीमुळे अनेकांच्या मृत्युस कारणीभूत ठरते. अर्थात जर काहीही बंधने नसतील तर विनाश अटळ आहे. मनुष्याचे तसेच आहे. अनिर्बंध जगणे दुःखच देते. आनंदी आयुष्यासाठी संस्काररूपी बंधने आवश्यक आहेत. अतुल दिवाकर
द्विचरण यत्न ना सोडिशी तोवरी, लक्ष्य ना गाठीशी जोवरी गरूड विहारे गगनी, भक्ष्य पकडी भूवरी । अर्थ : माणसाने तोपर्यंत प्रयत्नशील रहावे जोपर्यंत तो त्याचे ध्येय गाठत नाही. ध्येय गाठण्यासाठी जी कौशल्ये हवी आहेत ती आत्मसात करेपर्यंत त्याने स्वस्थ बसू नये आणि आपले ध्येय गाठावे. तीक्ष्ण नजर जो त्याचा अंगभूत गुण आहे आणि एकाग्रता जी त्याला भक्ष्य पकडण्यासाठी आवश्यक आहे, ह्या गुणांमुळे कितीही उंच आकाशात जरी उडत असला तरी गरूड जमिनीवरील आपले भक्ष्य बरोब्बर पकडतो. अतुल दिवाकर
किती रे करशील राग राग, तापशील आपला आपण वणव्यात जळते लाकूड,भावनेत जळशील तू पण । अर्थ : हा मनाबरोबरचा संवाद आहे. बर्‍याचदा आपल्याला खूप राग येतो. त्याची कारणे वेगवेगळी असतात. कोणाला मनाविरूद्ध झाले म्हणून तर कोणाला अन्याय झाला म्हणून. त्यामुळे आपण मनातल्या मनात खूप राग राग करतो. माणसाचा, परिस्थितीचा किंवा नशिबाचा. पण असे केल्याने आपल्यालाच त्रास होतो. जसे वणवा लागल्यावर त्याला कारणीभूत ठरणारे लाकूड जळून नष्ट होते, तसे तीव्र भावनांच्या आहारी गेल्यामुळे स्वतःलाच खूप त्रास होतो. व कदाचित या देहाचे बरेवाईट देखील. अतुल दिवाकर
आधार किती छान होईल जर मेंदू ब्लाॅक झाला तर मिळेल थोडा आराम सुट्टी चार दिवस वर विचांराना नाही राहणार हक्काचे घर कदाचित मग हृदय हळूच डोके काढील वर रात्र असो वा दिवस नाही फरक पडणार पुढे किंवा मागे मेंदू नाही बघणार नाही त्याला कधीच प्रश्न आता पडणार जगण्याचे गणित कोण आता मांडणार हृदयाची साद किती दिवस पुरणार भावनेवर कसे आणि दिवस जगणार शब्दांचे खेळ आपण का खेळणार चलनवलन आपले नाही ना थांबणार हृदय आहे ऊर्जा तर मेंदू आहे स्त्रोत जीवनरूपी दिव्याची ही आहे ज्योत मी आहे खलाशी आयुष्यरूपी होडीचा जगण्यासाठी आधार मला ह्या जोडीचा अतुल दिवाकर
आभास पावसाची सर आली घरंगळत वाळलेल्या पिकांना ठेवले ओल्यात होरपळत आपल्या लेकरांवर देवा का तू कोपला संसार त्यांचे मोडतांना कसा तू झोपला तुला बोलण्याचा हक्क आहे मला रागाव तू माझ्यावर काही बोलणार नाही तुला तुझ्या अशा वागण्याचे काय आहे कारण नको रे ठेवूस शेतकर्‍यांचे जीव तू तारण ही परिस्थिती तुला नक्कीच आहे माहीती का माहीती असूनदेखील करतोस आमची फजिती कशाचा तू इतका घेतो आहेस बदला माय ठेउन पोरांची घेऊन गेलास दादला चूकलो असू आम्ही कर आम्हाला शिक्षा मार चार छड्या पण पदरात घाल भिक्षा असाच जर वागत राहिलास तर तुझ्यावर कसा ठेवू विश्वास तूच आमचा मायबाप हा असेल फक्त आभास अतुल दिवाकर
मी बालक रांगत रांगत चालू लागलो चालता चालता पळू लागलो कळेना मग माझेच मजला बालपण कधी हरवून बसलो बोबडे बोल बोलता बोलता किती कठोर बोलू लागलो मार्दव माझ्या वाणीमधील कळेना कधी घालवून बसलो व्यवहारी जगात जगता जगता निरागसता लोप पावली कमाई मग मोजता मोजता नात्यांमधली भावना संपली बालदिनाचे निमित्त झाले स्वतःलाच मग शोधू लागलो मोठेपणाचा मुखवटा टाकून बालक होऊन रांगू लागलो अतुल दिवाकर
गुणदोष गुण म्हणाले दोषाला का रे तू जन्मला नसता जर तू भूमीवर मानव असता किती चांगला तुझ्यामुळे रे तंटा होई दुष्टता पसरवी तू भल्याभल्यांना कळत नाही तुझ्या येण्याचा हेतू । मानवाची प्रगति होते मी येथे असण्याने सर्वदूर ती पसरे शांती तू इथे नसण्याने येताच तू कळे जगाला अस्तित्व तुझ्या असण्याचे कळेना मज काय मिळे तुज फलित अशा वागण्याचे । दोष वदला का रे करसी गर्व स्वतःच्या स्वभावाचा स्वतःच स्वतःला उच्च ठरविसी मज दिसे हा दोष तुझा माझ्यामुळेच तुझी ओळख कसे तू हे विसरला का आपल्याच मस्तीमध्ये इतका तू दंग झाला । मान्य मला रे मी न् चांगला घाबरती लोक मला करती पूजा तुझी सगळे, मी नकोसा कोणाला सांग मला रे तुझ्यामुळे, कोण इथे जन्मला माझ्यामुळे बघ ह्या भूमीवर देव जातसे पूजिला । अतुल दिवाकर
द्वंद द्वंद चाले मनात माझ्या बुद्धिचे अन् हृदयाचे मिळत नाही उत्तर मजला ह्या एका प्रश्नाचे जिंकायाचे कोणी अन् कोणी यात हरायचे विचारातच कदाचित ह्या आयुष्य हे संपायचे । एक आहे विचारवंत, भावनाप्रधान दुसरा एक चाले तर्काने , हळुवार मनाचा दुसरा लोहपुरूष बिरूद मिरवे एक अभिमानाने धडधड होते दुसर्‍याची, इतरांच्या काळजीने । कळेना मज व्यथा म्हणावे का हा आशिर्वाद साधावा मी या दोघांमध्ये कसा बरे संवाद गुपित कसे हे उलगडेल मज सांगेल का कोणी एक मला कठोर बनवे, दुसरा आणतो लोचनी पाणी । अतुल दिवाकर
सुख म्हणजे काय असतं सुख म्हणजे काय असतं हव्या हव्याशा गोष्टी हातात मिळणं का मन जाणणारी व्यक्ति सोबत असणं सुख म्हणजे काय असतं जिभेची चव भागवणार अन्न ताटात असणं का जीवन रूचकर करणारे कोणीतरी आयुष्यात असणं सुख म्हणजे काय असतं हातात पैसा आणि फिरायला गाडी असणं का कठीण परिस्थितीत आपला हात हातात धरणारं कोणी बरोबर असणं सुख म्हणजे काय असतं बायको मुलगा असे आदर्श जीवन असणं का आपण दुसर्‍याचे जीवन आदर्श करण्यात सुख मानणं सुख म्हणजे काय असतं एक सुखी आणि समाधानी आयुष्य का समाजासाठी धडपडणारं असमाधानी आयुष्य सुख म्हणजे काय असतं पूजापाठ आणि व्रतवैकल्ये का माणुसकी आणि दानशूरता अतुल दिवाकर
बदल आली दिवाळीची सुट्टी शहरी मुलांना हवा बदल जरा गावाकडची मुले राबतात उन्हात येउन शेतात बघ जरा रहायला बंगला फिरायला गाडी शहरामधली ऐटच न्यारी मातीचे घर शेणाने सारव जाता येता बैलगाडीची वारी हायफाय टीव्ही वायफाय नेट भरपूर चॅटिंग क्वचितच भेट लंगडी, खोखो, चोर पोलीस शेतात पंगत खा भरपेट पैसे द्या अन् व्यायाम करा तब्येत नीट ठेवायला सल्ला घ्या जीवनशैली व्यायामाने परिपूर्ण विहीरीत डुंबा, रानमेवा खा शहरी लोक गावाकडे येतात एक बदल हवा म्हणून गावाकडच्या आम्हाला काय हवे आधी घ्या जाणून अतुल दिवाकर
सार्थक आयुष्य म्हणजे वळणा वळणांचा रस्ता का चढ उताराचा आणि न संपणारा शिकलेला माणूसही आहे इथे कोरा अडाणी माणूस भरवतो भुकेलेल्यांना चारा । देवाने दिली होती चालायला पायवाट वर निसर्गाची लेणी घातली होती पदरात मानवा ! रमलास तू फक्त तुझ्याच आनंदात तुझा हा स्वार्थच करत आहे आत्मघात । झुळझुळ वाहते पाणी, पक्ष्यांची किलबिल पुनवेचा चांदोबा आकाशातील कंदिल निसर्गाची हाक कधी रे ऐकशील का सारे आयुष्य असेल वाया घालवशील । ही काळी माती तुझी आहे धरणीमाता हो समजुतदार अन् सोड स्वार्थ आता मुकशील नाहीतर आनंदाला तू येता जाता द्यायला जर शिकला नाहीस तू घेता घेता । अतुल दिवाकर
आजच्या वर्तमानपत्रात नवर्‍याने बायकोला क्रूरतेने मारल्याची बातमी वाचून मन विषण्ण झाले. अतिरेक सगळीकडे हिंसा, क्रौर्य अन् जुलूम चाललय ह्या पृथ्वीवर किती बेमालूम कमी झाली माणुसकी ह्या आधुनिक जगात असे असताना देवा कसा बसतोस तू स्वर्गात  । तुझ्या ह्या जनतेवर नाही तुझे लक्ष किती भयानक वागत आहेत ते तुझ्या अपरोक्ष खाली ये ताबडतोब सोड तुझे कक्ष नाहीतर करेल मानव, मानवालाच भक्ष । नाहीस तू बहिरा अन् नाहीस तू आंधळा बघत काय राहिलास इथला गोंधळ सावळा नवरा आवळतोय इथे बायकोचा गळा वेळ नको लावूस घे हाती कारभार सगळा । ह्याचसाठीस बुद्धी माणसाला का तू दिलीस नाही वागले नीट तर काय तरतूद केलीस विचार ना जाब असा का वागलास का बघून त्याचे वागणे तू पण सुन्न झालास । कसा काय माणूस स्वतःला बदलणार का तो असाच मारत मारत मरणार दायित्व तुझे कधी तू निभावणार ये आता लवकर नाहीतर तुला माफ नाही करणार । अतुल दिवाकर
आयुष्याचे झाड आयुष्य म्हणजे एक झाड मुळे आहेत पिढीजात संस्कार तीच तर असतात जगण्याचा आधार जेवढी मुळे खोल तेवढे झाड उंच पिढ्यांची पुण्याई बनवते माणसाला स्वच्छ  । खोडाचे काम देणे फांद्यांना आधार तसे स्वभावच आहे तुमच्या जीवनाचे सार असेल जर स्वभाव गुणी अन् सत्शील मैत्री आणि नाती नक्कीच टिकवशील । फांद्या म्हणजे आहेत झाडाचाच विस्तार दृष्टिकोनच तुमचा बनेल जनाधार जेवढ्या दूर पसरतील वृत्तीचे तरंग समवैचारिक जनांचा लाभेल तुम्हा संग । व्यक्तिमत्व आहे या झाडाची पाने  जग तुम्हाला बघते याच्या रूपाने नका बदलू रंग ऋतुमानाप्रमाणे आयुष्यभर मग गात रहाल जीवनगाणे । पाने फुले ही तर आहे कमाई आरोग्य राखाल तरच मिळेल ही मलई शरीर आणि मन असेल तंदुरुस्त समस्या मग संपल्याच समस्त । अतुल दिवाकर
मनःस्थिती हृदयाची धडधड वाढवते जीवाला घोर लावते सतत अस्वस्थ करते वाट पहाणे । मन आनंदी होते जग सुंदर वाटते हसत रहावेसे वाटते जेव्हा यश मिळते । वेळ खायला उठतो कामात रस नसतो प्रगतीचा आलेख खाली जातो जेव्हा अंगात कंटाळा भरतो । डोळे सतत भरून येतात मनात भावना थैमान घालतात जगणं नकोसे करून सोडतात दुःखाचे जेव्हा विचार येतात । नाती जपली जातात बोलणी आपुलकीची असतात कुटुंब एकत्र असतात जेव्हा माणसे मायेची असतात । अतुल दिवाकर
जगण्याची रीत जगणं झालयं पैशाचा खेळ अन् आयुष्य म्हणजे भावनाची भेळ पैसा व भावना यांचा साधेल जो ताळमेळ सुखी होईल या जगी तो । समोर आहेत किती प्रलोभने कसे ठरवू काय हवे नको ते बुद्धी व मनाचे द्वंद्व रोजचे सुखी तो जो जाणेल गरज काय ते । जीवनशैली झाली आजारपणाचा रस्ता नकोशा झाल्या आयुष्यात खस्ता जीव झाला किती सस्ता सुखी होशील उत्तम आरोग्य असता । शिक्षणाची रीतच वेगळी कमाईची साधने सगळी गुणवत्ता झाली लुळीपांगळी गुणांची शर्यत अशी ही खेळी । आजचे राजकारणी तोबा तोबा सगळेच भाई, दादा वा आबा गुंडाशी आहे ह्यांचा घरोबा राजकारण विसरा नाहीतर एकमेकांशी झोंबा । अतुल दिवाकर
बाप्पा बाप्पा तुमच बरंय, दहा दिवस राहून तुम्ही निघालात इथला त्रास तुम्ही फक्त दहाच दिवस सोसलात आम्हाला इथे असेच टाकून असे कसे तुम्ही जाणार आमची सगळी दुःखे तुम्ही नाही तर कोण ऐकणार । बाप्पा तुम्ही विद्येची देवता तुमच्या कडे आहेत चौषष्ट कला चुका पोटात घेणारे लम्बोदर तुम्ही म्हणून का लोकांनी तुमचा बाजार मांडला । विघ्नहर्त्या आमचा त्रास कधी संपवणार का आम्हाला तू इथे असाच मारणार हा धांगडधिंगा अन् ही अरेरावी सहनशीलतेचा अंत बघणार तरी किती। गजकर्णा तुझ्यासमोर उभ्या राहतात स्पीकर्सच्या भिंती त्याच्या आवाजाने तरी उतरेल का तुझी भ्रांती सुशिक्षित समाजाचे बघून हे आचरण वाटत असेल तुला यावे सीतेसारखे मरण । गणेशा त्यापेक्षा जरा घे तू मनावर ह्या so called भक्तांना जरा घे फैलावर दाखवून दे त्यांना कसा असतो तुझा राग येउ दे ह्या कुंभकर्णांना एकदाची जाग । अतुल दिवाकर
संवाद हृदय म्हणाले मेंदूला किती रे तू हिशोबी सतत मांडतोस गणिते पैसा कमावणे तुझी खुबी । सतत असतोस व्यग्र प्रत्येक गोष्टीचा करतोस विचार कसा तू थकत नाहीस पाळून सतत इतके शिष्टाचार  । तुला कधी वाटत नाही का मनमोकळे जगावे जे जे येते मनामधे ते ते सांगून मोकळे व्हावे । माझ्याकडे बघ जरा कसा मी भडाभडा बोलतो एवढ्याश्या तेवढ्याश्या गोष्टीवरून डोळ्यात पाणी आणतो । जोडतो मी माणसे हिशोब न ठेवता माझ्यातच रमतो मी गणिते न मांडता । करतो मी पण विचार पण तो दुसर्‍याचा झिजत असतो सतत सगळा खेळ भावनांचा । मेंदू म्हणाले हृदया आपण दोघेही महत्वाचे हवा मी जगण्यासाठी तू बीज नात्यांचे, तू बीज नात्यांचे । अतुल दिवाकर
विचार बसलो होतो शांत निवांत एकटाच करत विचार मन घालत होते डोक्यात विचारांचे आचार काही होते गोड तर काही एकदम झणझणीत एवढेस्से माझे डोके किती विचार साठवणीत । काही मवाळ धोतर सदर्‍यातले तर काहींची होती कडक वर्दी दाटीवाटीने बसून डोक्यात केली भाऊगर्दी मीठ नसलेल्या भाजीसारखे काही होते बेचव पळत होते सशासारखे काही संथ कासव । रूतलेल्या बाणासारखे टोचत होते काही सांडत होते काही जशी गळक्या पेनातली शाई ओरडत होते काही जणू वाघाच्या डरकाळ्या सरपटत होते काही जशा टम्म फुगलेल्या अळ्या । त्यातच दिसला एक जो बसला होता शांत कळेना मला इतक्या गर्दीत हा कसा निवांत कारण विचारता तो बघून गोड हसला म्हणाला अरे राजा जो नाही वर्तमानात तोच इथे फसला । अतुल दिवाकर
गणेशा तू आहेस विद्येची देवता मग लोकांमधे का बुद्धीची कमतरता तुझा जन्मदिवस करतात ते साजरा हे दहा दिवस शांतता विसरा । त्यांचे का नाही तू कान उपटत कसे वागावे हे त्यांना का नाही शिकवत हे दहा दिवस त्यांना येते उधाण तू असतांना का आमचे कंठी येतात प्राण । तुला येता जाता ते मिरवत नेतात रस्त्याचा स्वतःकडे ताबा ते घेतात हीच का तू त्यांना बुद्धी रे दिलीस का नाही वेळीच त्यांना शिक्षा तू केलीस । तुझ्याकडे उगाच गार्‍हाणे मी मांडतो आम्हीच तर तुला दहा दिवस कोंडतो अशी कशी शिक्षा तू सहन करतोस माजलेल्या लोकांची का नाही जिरवतोस । वाईट वाटते सांगायला सदाचार इथला संपला तुझा उघड उघड बाजार ह्यांनी मांडला वर्गणीच्या नावाने पैसा केला गोळा चांगुलपणाचा केला ह्यांनी चोळामोळा । तुला निरोप देतांना ह्याच्या येते अंगात टिळकांना कळाले तर वाटेल उगाच पडलो फंदात एकतर पृथ्वीवरून तू गायब व्हावेस नाहीतर ह्यांना कडक शासन करावेस । बोल तुला ह्यातले काय आहे पसंत राज्य आले लुच्च्यांचे कोणी नाही संत एकटा पडशील अपुरा विचार करून ये नाहीतर तुझ्या बाबांना बरोबर घेऊन ये । अतुल दिवाकर
सरळ वागणार्‍यांना होतो इथे त्रास भाविक करतात इथे कडक उपवास धूर्त लोक खातात अन्न सुग्रास कसा तुझा न्याय दुर्जनांना मिळते वागणूक इथे खास । ----------------------------------- कळतय पण वळत नाही अस का होते तेच कळत नाही मी नाही त्यातली आणि कडी लावा आतली लोकांचे असेच चालू पण बोलायची सोय नाही । ----------------------------------- भारत सरकार आणतय डाॅलर्स अब्जावधी शेतकर्‍याच्या घरात चूल पेटत नाही साधी सरकारचा नारा भारताचा विकास शेतकर्‍याची घरे, उदास आणि भकास ----------------------------------- सिमेंटचे जंगल अन् काॅक्रिटचे रस्ते मनुष्याचे जीवन झाले एकदम सस्ते नको नातीगोती, हवे व्हर्चुअल जग गोठली विचारशक्ति, अडले तर गुगल बघ ----------------------------------- शतक चालू एकविसावे, प्रगती झाली मोप विज्ञानाची भरारी, अंतराळात घ्या झोप विमानाचा प्रवास, क्षणात इकडून तिकडे पण एवढ्या फाॅरवर्ड जगात सुख गेले कोणीकडे । ----------------------------------- एकीकडे महाल तर दुसरीकडे झोपडी देवा तुझ्या पृथ्वीवर केवढी ही विषमता शिक्षणाचा व्यापार आणि देवांचा बाजार ह्या जगात मानवा केवढी तु...
चंद शेर ..... आपने जो उठायी निगाहें ,माहौल में खुशी सी लहरायी ... उसपर आपकी हसी ,दिल के तार छेड गयी. । ----------------------------------- खुदा ने पुछा " बोल तेरी रजा क्या है ? " मैने कहा कि ऐ खुदा मुझे उनकी आँखों में बसा दे पानी बनाकर, दिखाई ना दू लेकिन हरदम उनके साथ रहूँ । खुशी के आंसू बनकर खुशी बढाऊ और दुख में आंसू बनकर दुख कम करू । ----------------------------------- हमने उनसे कहा कि अगर आपको खुदको देखना है तो आईना देखो और जानना हो तो बस हमारी आँखो में झांक लो । ----------------------------------- हमने उनसे कहा कि आपकी इन खूबसूरत आँखो से कभी तो हमें देखिए  ..... आपको तो हम बंद आँखोसे भी देखते रहतें हैं  । ----------------------------------- उन्होंने कहा कि किस्मत ने साथ दिया तो फिर मिलेंगे ..... हमनें कहा ऐ किस्मत इम्तिहान हैं तेरी वफ़ा का क्योंकि हम तो उनका साथ नहीं छोडेंगे ..मरने के बाद भी । ----------------------------------- शब्दों के बिना हम कह नही सकते अपने जज्बात... आप तो पूरी कहानी बयां करते हैं अपनी आँखों से । -----------------------...
आज अचानक असे काय झाले हसता हसता नयन भरून आले प्रकाशात तिमिर दिसू लागले करावे काय काहीच कळेनासे झाले । रंग माणसांचे कसे बदलून गेले नको ते रंगच का दिसू लागले आश्चर्याचे धक्के बसू लागले अशक्य वाटे ते शक्य होताना दिसले । नशीब देवाने दिले फक्त एकच मन जास्त असते तर.. कल्पनेनेच थरथरते तन किती सोसावे याची गणतीच नाही सहनशक्तीचा अंत कसा होत नाही । आक्रंदित राहिलो माझा मीच एकटा ना मिळे रस्ता ना दिसती वाटा नागमोडी ही वाट संपेल का कधी का संपेल हे जीवनच मार्ग मिळण्याआधी । अतुल दिवाकर
टिळक व बाप्पांचा संवाद बाप्पा तुमच्याशी मला, थोड बोलायचं आहे आज समाजातील लोकांशी कस वागायच, ते ठरवायचं  आहे । काय काय ठरवून उत्सव तुमचा, केला होता सुरू वाटले होते भारतमातेला, परक्यांच्या जोखडातून मुक्त करू कल्पनाच नव्हती की पिढी, बेशिस्तीच्या आहारी जाईल स्वतःबरोबरच माझ्या मातेला, इतका त्रास देईल । म्हणून म्हणतो बाप्पा, तुमच्याशी मला थोड बोलायचं आहे आज समाजातील लोकांशी कस वागायच, ते आता ठरवायचं  आहे । दिले होते मुलांना, मी सर्व संस्कार केला होता प्रयत्न, त्यांच्या आयुष्याला द्यायला आकार कधी हे संस्कार तुटले ते कळालेच नाही आयुष्य त्यांचे भरकटले, दोर तुटलेला पतंग जणू काही म्हणून म्हणतो बाप्पा, तुमच्याशी मला थोड बोलायचं आहे आज समाजातील लोकांशी कस वागायच, ते आता ठरवायचं  आहे । उत्साही तरूणाईचे स्वप्न, बघितले होते मी जाज्वल्य देशप्रेमापुढे ठराव्यात, इतर गोष्टी निकामी गॅजेट्सच्या आहारी गेलेल्या तरूणांना, योग्य मार्ग दाखवायचा आहे माझ्या स्वप्नातली तरूण पिढी, मला घडवायची आहे म्हणून म्हणतो बाप्पा, तुमच्याशी मला थोड बोलायचं आहे आज समाजातील लोकांशी कस वागा...
जलन जलन है मुझे काजल से जो आपकी ऑंखों में रहता है .. हरदम । जलन है मुझे गजरे से जो आपकी बालों से खेलता है .. हमेशा । जलन है मुझे कंगन से जिसे बडे प्यार से आप पहनती है । जलन है मुझे लिपस्टिक से जो आपके होठों पे सजती है । लेकिन क्या आपको पता है मुझे सबसे ज्यादा जलन किससे है । मुझे सबसे ज्यादा जलन है Whats App से .. क्यूं ? क्यों कि वह बोल नही सकता लेकिन आप हमेशा उससे बाते करती है । सोचने के लिए उसके पास दिमाग नही होता लेकिन आप उसके बारे में  हमेशा सोचती है । ना उसके हाथ है ना पाव फिर भी हमेशा आपके हाथ मे और नजर के सामने रहता है । और सबसे परेशानी तो मुझे इस बात की है की उसका दिल नही होता लेकिन आप का दिल उस कंबख्त के लिए धडकता रहता है ...हमेशा  ।। अतुल दिवाकर
बाप्पा आले वार्‍याच्या लहरींवरून फिरत आला प्राजक्ताचा सुवास मन प्रसन्न केले अन् सुरू झाला आनंदी प्रवास जिकडे पहावे तिकडे वातावरण दिसे झकास बाप्पांच्या आगमनाने मनाला वाटू लागले खास ।। सुंदर मुर्ती बैसली सिंहासनावरी आनंदाने केली प्रतिष्ठापना घरोघरी सजली बघ आरास ठेविले विडे पाटावरी एका हाती मोदक अन् कमळ दुसर्‍या करी ।। दुर्वांची जुडी शोभे मुकुटावरी गळ्यात जानवे,चमकते शेल्याची ती जरी पायापाशी बैसली जोडूनी कर उंदीरमामांची स्वारी लाल जास्वंद बाप्पांची आवडती गोष्ट ती खरी ।। घेऊनी दर्शन मन होते प्रसन्न खरोखर हरपून भान होतो नतमस्तक मी पामर सात्विकतेचे भाव पसरले सर्वत्र दूरवर बाप्पा आले अन् धरती नटली सुंदर ।। अतुल दिवाकर
मन माझे मना तुला कसे सांभाळू ताब्यात ठेवण्यासाठी का कुरवाळू तू तर स्वतःच्याच धुंदीत चालतोस आमच्या इच्छेवर थोडीच तू झुलतोस ।। झाडांसाठी आपण खतपाणी घालतो पक्ष्यांना आपण दाणापाणी देतो स्वतः अन्नावर उभा आडवा हात मारतो तुझ्यासाठी बोल, काय करावे म्हणतोस ।। मला हवा वर्तमान, तू फिरतोस भूतकाळात ओढून ताणून आणले, तर क्षणात जातो भविष्यात कसा रे तू थकत नाहीस, थोडासुद्धा दम घेत नाहीस सतत उड्या मारायचे, तुझे काम थांबवत नाहीस ।। तुझ्यासाठी मी, काय काय नाही केले कितीतरी देवळांचे उंबरठे झिजवले तू मात्र मला नेहमीच खिजवले बरोबर राहीन म्हणत सतत फसवले ।। काय हवे तुला, एकदाचे सांगच मला बघतोच मग कसे, कह्यात ठेवायचे तुला सुरळीत बघ कसे, होईल मग जीवन उन्हाळ्यात जणू, येईल मग सावन ।। अतुल दिवाकर
बाप्पांचा संदेश चाललो होतो गडबडीत, तयारी करण्यासाठी बाप्पांच्या येण्याची समोर कोणी चालले होते तंद्रीत नव्हती घाई पुढे जाण्याची ।। वैतागलो, म्हणालो ओ अहो चला भरभर किती संथगतीने चालला आहात सर तुम्हाला नसेल पण आम्हाला आहे घाई कशी नाही तुम्हाला सणाची नवलाई ।। नाही पडला फरक चालण्यात थोडाही कळेना मला काय करावे काही म्हटले जाऊन कानात त्यांच्या ओरडावे गेलो जवळ तो सुचेना काय करावे ।। ज्यांच्यासाठी माझी चालली होती गडबड तेच चालले होते करत स्वतःशीच बडबड गेलो जवळ तेव्हा कळून आले सारे तुम्हीसुद्धा थोडे लक्ष इकडे द्या रे ।। बाप्पांच्या हातात यादी होती एक ती वाचत स्वारी चालली होती मजेत पहिली होती वस्तू कानातले बोळे चेहर्‍यावर त्यांच्या भाव होते भोळे  ।। त्या नंतर लिहीले होते विमानाचे तिकिट ट्रॅफिक जाम झाल्यावर नको किटकिट झोपेच्या गोळ्यांचा मग होता नंबर दहा दिवस जाग्रण झोप हवी नंतर ।। बँकेतून पैसे काढून भरायचे आहेत खिसे मंडळवाले नाहीतर काढतील पिसे दिले नाही तर काय करतील याचा नेम नाही त्यांच्या जुलूमापुढे माझेही चालत नाही ।। मी म्हणालो देवा आता बास करा आम्ही खू...
सोमवारची सकाळ सोमवारची सकाळ म्हणजे सेकंदाचा हिशोब त्यात ट्रॅफिक जाम म्हणजे सगळीच बोंबाबोंब मनाची घालमेल अन् हृदयाची धडधड गाडी चालवणार्‍याची मग उडते गडबड ।। हाॅर्नचे आवाज तोंडात शिवी रस्त्यावरील कंडिशन बंपरला बंपर लावी थोडीशी जागा लगेच घुसव गाडी जणू प्रत्येकजण घुसण्याचा संकल्प सोडी ।। रस्त्याची अवस्था वर्णन करू कोठवर पहिल्याच पावसात खड्डे खड्ड्यावर गाडीत बसणार्‍यांना नौकेची मजा गाडी चालवणार्‍याला जन्मठेपेची सजा ।। अतुल दिवाकर
प्रेमगीत साथ ही तुझी, प्रिये जणू गारवा तप्त ही धरा, अन् तू चांदवा ।। विशाल नभासारखे हृदय हे तुझे सामावून घेशी तू अनंत अपराध माझे चिमण्या आपुल्या घरट्याला,आधार तुझा लाभला राजा राणीचा संसार, तुझ्यामुळेच सजला ।। तुझ्यामुळे मी शिकलो, प्रेमाची परिभाषा तूच माझी स्फूर्ति अन् जगण्याची आशा नीरस जीवनगाणे पण तू सुरेल पावा साथ ही तुझी, प्रिये जणू गारवा ।। ऐक ग साजणी, प्रसन्न या क्षणी हातात हात तुझा अन् ओठी प्रेमगाणी लटके तू चिडावे अन् मी तुला मनवावे हळूच मग हसुनी तू मजजवळ यावे ।। साथ ही तुझी, प्रिये जणू गारवा तप्त ही धरा, अन् तू चांदवा ।। अतुल दिवाकर
पाऊस तरसलेल्या मनावर पाऊस तो बरसला दाह माझ्या मनाचा शांत करून गेला किती मी बघू घना तुझी रे वाट उशिरा का असेना आलास तू घनदाट आसमंतात सार्‍या उत्साह तो पसरला उशिरा का असेना पाऊस तो बरसला तुझ्यासाठी हरेक जण चातक तो बनला हळूच बघ कसा नभात तू दिसला नको रे असा आम्हावरी तू चिडूस प्रतिक्षा  दरवर्षी आमची तू वाढवूस अतुल दिवाकर
आहेर तुम्हाला काय वाटते कालचेच फक्त चांगले होते अन् आजच्या जगातले काय फक्त त्रास देते हो हो खरे आहे भाजी भाताला चव असते अहो पण पायाला भिंगरी असता जाऊ तेथे पोट भरावे तर लागते आपली भाषा यायलाच हवी पण आजची गरज, बोला भाषा नवी नवी जगाच्या सीमा पडल्या गळून नाविन्याची महती आली कळून आजीची गोधडी एक नंबर गोट्या चिंटू सातवे आसमानपर तरीसुद्धा जीन्सची महती कमी होत नाही आणि स्मार्टफोनशिवाय दिवस सुरू होत नाही सारवलेली जमीन अन् मातीची घरे मनाला भावायचे हे मात्र खरे पण सिमेंटच्या घरात अन् थंडगार आज A C त बदललेल्या हवामानात वाटते बरे? विसरू नको मानवा तुझीच ही करणी होती पुर्वी तशीच आता आहे धरणी तू मात्र गेलास आवाक्याच्या बाहेर म्हणूनच मिळाला तुला हा आहेर अतुल दिवाकर
भ्रमनिरास असेच ठरवले कृष्णाने पृथ्वीवर जाऊन यावे आपल्या जन्मदिवशी काय चालले ते पहावे ।। त्याला दिसले गायींचे कळप त्यांच्याबरोबर त्यांची वासरे कृष्णाला वाटले हे छानच झाले इथे तर गोकुळच अवतरले ।। जवळून पाहता आश्चर्य वाटले मोकाट जनावरे असे तिथे लिहिले धेनू अन् वासरे उकिरड्यात बसले हे पाहून मन हेलावून गेले ।। थोडे पुढे त्याला गोपाळ दिसले त्यांना पाहून त्याचे मन आनंदले त्यांच्यासमवेत खेळू असे ठरवले जवळ जाऊन बाळकृष्ण उभे राहिले ।। पण गोपाळांचे लक्षच नव्हते हाती मोबाईल नामक खेळणे होते कँडी क्रॅशचे आवर्तन चालले बाळकृष्ण ते पाहून बुचकळ्यात पडले ।। अचानक कानी गोपींचे आवाज आले पटकन तिथे जावे असे ठरवले क्षणात कृष्ण तिथे जाउन पोहोचले वातावरण तेथील होते धुंद झाले ।। गोपींच्या हाती चिरूट होते धुरांची वलये आकाशी जात होते काहींचे पाय थिरकत होते हे पाहून कृष्ण खिन्न झाले ।। कृष्णाला काहीच समजेनासे झाले एक पटले, सर्व आवाक्याबाहेर गेले लहान थोर सर्व कलियुगाचे झाले जसे आले तसे कृष्ण परत गेले ।। अतुल दिवाकर
आजच्या तरूणाईचे वास्तव. एक जळजळीत सत्य. आजची पिढी आजची पिढी निरर्थक मोबाईलवर असते अथक टीव्ही म्हणजे जन्माचे सार्थक कधी बनतील हे विद्येचे साधक अंगात असे तारूण्याची मस्ती यांच्या लेखी नाती सस्ती नाही यांना जिंदगीची धास्ती मौजमजेची अंगी वस्ती ओतप्रोत भरला कंटाळा मैदान सोडून मोबाईलवर खेळा सोसत नाहीत आयुष्याच्या झळा यांच्यावर बिसंबा अन् सोसा कळा शिस्त म्हणजे असते काय व्यायमाची सवय नाय घरात कमी बाहेरच पाय ऐसे जगणे हाय हाय काही असती यांच्यात वेगळे ते राजहंस बाकी बगळे जीवन त्यांचे असे आगळे सर्वसामान्य बाकी सगळे अतुल दिवाकर
आजकाल आपण आपल्या जुन्या सवयी किंवा गोष्टींमधे रमतो. त्या कशा छान आणि आताच्या कशा वाईट याची चर्चा करतो. त्याबद्दलचा एक दृष्टीकोन. आधुनिकता आपल्याला हवी भाजी भाकरी आपल्याला हवी आजीची माया आपल्याला हवे एकत्र कुटुंब पण नको आपल्याला आधुनिकतेची छाया मुलांनी आपले ऐकले पाहिजे रोज रोज पाढे घोटले पाहिजे पूजा संध्या केलीच पाहिजे पण कास आधुनिकतेची सोडली पाहिजे घराभोवती बाग हवीच घरातला कर्ता तो मीच माझे महत्व टिकायला हवे बायकोने मात्र घरातच रहायला हवे का बरे रमतोस भूतकाळात तू आधुनिक जगाबद्दल ठेऊन मनात किंतू धर नव्या जगाची कास असू दे तुझ्या मनात विश्वास विज्ञानाची साथ तुझ्यासाठीच मानवतेच्या कल्याणासाठीच पण त्याला बदनाम केले तूच आणि वर बोंब मारतोस तूच टीव्ही आला अन् तू घराघरात पोहोचलास मोबाईलमुळे तू रेंजमधे आलास इंटरनेटमुळे तू सर्वत्र फिरलास मग आधुनिकतेला तू का रे त्रासलास मर्म आनंदाचे ऐक सांगतो सुखी तो जो यांचा सदुपयोग करतो जो माणूस व्यसनाधीन होतो या जगी तो दुःखीच होतो अतुल दिवाकर
नाते काही बंधने बंधने नसतात दोन जीवांची नाती असतात भावना असतात त्या उस्फूर्त नका देऊ त्यांना स्वरूप मूर्त नका बांधू , त्यांना फक्त धाग्यात नाती जपा, आपल्या हृदयात नाव नका, देऊ त्यांस कारण ती असतात, नावातीत खास आपलेपणाने भांडावे खोटे खोटे रागवावे लटके लटके रूसावे पण भरपूर प्रेम करावे न बोलता मनातले ओळखावे आपले प्रतिबिंब डोळ्यात बघावे सूर कृष्णाच्या बासरीसारखे असावे नाते असे सुंदर असावे अतुल दि
विज्ञान आणि धर्म एकाचा पाया सिद्धांताचा तर दुसर्‍याचा परंपरेचा विज्ञान म्हणजे शक्ति तर धर्म म्हणजे भक्ति विज्ञान डोळ्याने बघते धर्माला डोळ्यापलिकडचे दिसते विज्ञान अनेक लोकांना कामाला लावते तर धर्माने वागले तर देवाला भावते विज्ञान प्रश्नांची उत्तरे शोधते धर्म नवनवीन प्रश्न पाडते एकामधे उत्साह तर एकामधे रस दोघेही आपापल्या ठिकाणी सरस विश्वास म्हणजे धर्म विज्ञान म्हणजे कर्म अतुल दिवाकर
इंद्राणी मुखर्जी  प्रकरण काॅर्पोरेट जग चेहरे गायब राज्य मुखवट्यांचे स्वतःच स्वतःला फसवणार्‍यांचे कोणाचेच इथे नसती लागेबांधे आप्तांचे असती नातेवाईकांबरोबर वांदे फसवणूक हा इथला बालवाडीचा धडा कोणालाही इथे वेडे करून सोडा अंगभर कपडे असून माणूस इथे उघडा सगळ्यात कपटी माणूस असतो इथे बापुडा पैशांच्या राशी मद्याचे सागर संबंध म्हणजे अनैतिकतेचा कहर जिभेवर साखर मनात जहर डोके असती कूटनितीचे आगर दिखावा किती याला मर्यादाच नाही अमर्याद धुंद जगणे इथे पाही लाज कोणालाच नसे लवलाही बघून हे होते अंगाची लाहीलाही तोकडे कपडे गळ्यात गळे कोण कोणाचा कोण काहीच न कळे बघून ही नाती देव झाले बावळे स्वर्गलोक सोडून गेले काशीयात्रेला सगळे अतुल दिवाकर
आश्चर्य एक धागा रक्षाबंधनाचा बहिणीने भावाला प्रेमाने बांधण्याचा एक तार हृदयाची पती पत्नीने आयुष्यभर एकत्र राहण्याची एक अदृष्य बंधन दोस्तीचे अनोखे स्पंदन एक रस भक्तिचा गुरू आणि शिष्याच्या अनोख्या नात्याचा एक पदर मायेचा आईच्या मुलावरील हक्काचा एक लबाड नजर प्रियकराची प्रेयसीवर एक हळुवार फुंकर आजीची नातवासाठी सुंदर आश्चर्यचकित करणारी नात्यांची ही गुंफण त्यांच्यातली समानता म्हणजे समर्पण अतुल दिवाकर
माणसा तुला काय हवं जेव्हा तू जन्मतोस तेव्हा तू रडत असतोस बाळ असतांना हवे ते मिळाले नाही की भोकाड पसरतोस थोडा मोठा झालास की मित्रांकडे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून नाराज होतोस किंवा मनासारखे शाळा काॅलेज मिळाले नाही म्हणून आकांड तांडव करतोस नोकरीत कष्ट खूप आहेत म्हणून कटकट करतोस लग्नात मानपान झाले नाही म्हणून फुरंगटून बसतोस मुलगा हवा असतांना मुलगी वा मुलगी हवी असतांना मुलगा झाला की त्रासतोस मूल मनासारखं वागत नाही म्हणून चिडचिड करत राहतोस कितीही पैसा असला तरी तो तुला कमीच पडतो सजीवांपेक्षा तुझा जीव निर्जीवांवरच जास्त जडतो कस रे तुला कळत नाही काय आणि किती घ्यावं म्हणून मला प्रश्न पडतो की माणसा तुला नक्की काय हवं जन्माला येतांना तू का बरे नाही हसत जन्मापासूनच सगळ्यांपुढे वेगळा आदर्श ठेवत लहानपणी तुझ्या दिमतीला हजर असतात ना सगळे मग राजा असतांना हट्ट करू नये इतुकेही तुजला न कळे आपल्यासाठी झिजतात आई वडिल याची ठेव जाणीव भरभरून प्रेम मिळत असतांना तुला कशी रे भासते इतर गोष्टींची उणीव वेगळा आहेस तू बुद्धीमुळे तुझ्या इतर सर्व गोष्टी ज्ञानापुढे आहेत खुज्या सांगितले आ...
मी कोण रंग माझा शांतीचा अंग माझे प्रवाही माझ्याशिवाय बच्चे कंपनीचे काही खरे नाही मी कोण?..... दूध रंग माझे खूप,रूपे माझी अनेक सजीव निर्जीवांसाठीचे काम मात्र एक कधी घेतो अंग आकसून,कधी मोकळे सोडून देतो कधी येतो एकटा, कधी बरोबर मित्रांना आणतो मी कोण? ..... साबण अनेक वर्षांचा प्रवास करतो मी क्षणात शरीर मला नसले तरी आस्तित्व सर्वजणात मी कोण?...... मन कोमल माझी त्वचा, दिनकर माझा सखा ही धरा असे जननी, मी कोण ओळखा.. फुले माझ्यामुळे तू हसतोस, रडतोस माझ्यामुळे हे ज्याने जाणिले ते हुशार, बाकी सर्व खुळे मी कोण.... भावना अतुल दिवाकर
गर्व हमने देखें है आपकी आंखों में भविष्य के सुंदर सपनें आओ मिलकर बनायेंगे इन सपनों को हम अपने ।। आजादी का सही मतलब आपको आज हम समझायेंगे ना कोई भूखा, प्यासा ना कोई देश को जन्नत हम बनायेंगे ।। घर घर में हो पढाई नई पिढी बने स्वावलंबी हिंदू मुस्लिम या ईसाई कोई ना रहें परावलंबी ।। चलती रहे अपनी परंपराये संस्कारों से परिवार सुखी बनी रहे मित्रता और शांति ना रहे कटुता, रहे ना कोई दुःखी ।। इन्सानियत की हो मिसालें बहनों को मिले भाई का प्यार बुढ्ढों को मिले यहां सहारा लोगों को मिले सुखी संसार ।। जितना मिला है हमें यहां से हम लौटाये इससे दुगना गर्व होगा हमें जिंदगी से यहां से हमे जब होगा जाना ।। अतुल दिवाकर
प्रेम एक अव्यक्तपणे व्यक्त होणारी भावना हळुवारपणे फुलत जाणारी कोमलता आपलच असून दुसर्‍यासाठी धडधडणारं हृदय किंवा अलगदपणे मनावर फिरणारं मोरपिस जेव्हा सर्व रस्ते बंद होतात तेव्हा हाताला धरून वाट दाखवणारा दिलासा जेव्हा मन हताश झालेलं असत तेव्हा मिळणारा सळसळता उत्साह जीवनरूपी वाळवंटात बरसणारा पाऊस किंवा अमावस्येच्या रात्री चमचमणाऱ्या काजव्यांचा प्रकाश तिच्या डोळ्यात हरवून गेलेला मी किंवा माझ्यामधे मिसळून गेलेली ती शरीरे दोन पण एक मन एकाच्या हृदयात दुसर्‍याचे स्पंदन प्रेमाशिवाय हे जीवन व्यर्थ प्रेमामुळेच तर जीवनाला अर्थ प्रेमामधे नसतो स्वार्थ प्रेम करते जीवन सार्थ अतुल दिवाकर
राजकारणी आम्ही राजकारणी लोकहितवादी वरकरणी आतून पक्के स्वार्थी आव आणतो परमार्थी नैतिकता म्हणजे रे काय सर्व धंद्यात आमचे पाय पैशाबिगर काहीच चालत नाय शिक्षणसंस्था आमच्यासाठी दुभती गाय कशाचाही मांडतो आम्ही बाजार गुन्ह्यासाठी नाही लागत अवजार झाली जनता आमच्यामुळे बेजार पर्वा नाही जरी झाली निराधार तुंबडी आमची भरली पाहिजे त्यात वाढ सतत झाली पाहिजे आमच्याविरूद्ध जो बोलण्यास धजे ईश्वरही रक्षण करू शकत नाही त्याचे आजचा वैरी उद्याचा मित्र संचार आमचा असतो सर्वत्र कोणीही नाही आमच्यासाठी अपात्र ज्याच्यापासून फायदा तो पात्र गेंड्याची कातडी सापाचे विष पात्रतेचे हे असती निकष सतत आम्हाला हवे असते यश पचवू शकत नाही आम्ही अपयश सत्कर्मे आम्ही केली जरी फायदाच त्यात बघतो खरोखरी फुकटची नसते आमची वारी मिळेल ते सारे खिशात सारी अतुल दिवाकर
जोडी तांबडे फुटले दिवस उगवला आनंदाने कोंबडा आरवला सूर्यबिंब ते नभी अवतरले उत्साहाचे साम्राज्य पसरले सरता दिवस निशा बघ आली उत्साहाची नशा ती सरली सारी रयत थकून गेली हळूच जाऊन पांघरूणात शिरली ।।1।। आज असे मला काय झाले रोजचेच जग नवे दिसू लागले हात लावता जणू सोने झाले आनंदाने मन भरून गेले किती हे दुःख माझ्या पदरी मनही जणू झाले आजारी विधात्याने बघ दुःखे सारी ठेवली आणून माझिया शिरी ।।2।। आज असे पेपरात आले ब्रेनडेड बाईने आपले अवयव दिले चारजणांचे भले झाले जगात लोक किती चांगले विश्वासच नाही असेही असते कुंपणच इथे शेत खाते आपलेच रक्त जीवावर उठते वाईटाचे राज्य पसरते ।।3।। पैशांच्या राशी करोडोंचे बंगले ऐश्वर्याचे दिवस चांगले चांदीची ताटे सोन्याचे चमचे आविर्भाव ऐसा हे विश्वची आमचे खायची मारामार जगायचे वांद्य बाॅसची आज्ञा शिरसावंद्य हातावर पोट कष्टाची भाकर आयुष्य संपले बनून नोकर ।।4।। मर्दानी गडी मनगटात ताकद मिशीला पीळ हाकेला येई धावत दुनियेचा भार शिरावर पेलत कष्टाला नाही मागेपुढे बघत मायेचा सागर करूणेचे आगर प्रसंगी चंडिकेचे रूप अनावर संस्काराची जननी स...
कृपा करतो वंदन गणराया भक्त अतुल लागतो पाया भवानीमाते तुजला नमन स्मरणे तुझ्या दुःखाचे गमन नमस्कार तुला गजानना असू दे कृपा सकल जना देवा तुझा आशिर्वाद असता गरीब पामर सिंहासनी बसता कृपा तुझी झाली माझ्यावरी लिहू लागतो कविता बरी तुझ्या कृपेने मला भेटले सखे सोबती माझ्या शाळेतले मजला त्यांनी प्रोत्साहन दिले अन् सुप्त गुण मला सापडले चित्रे काही रेखाटू शकलो अक्षरे थोडी जमवू शकलो जरी हे केले मी माझ्या करे असशी कर्ता करविता तूच बरे आज अर्पितो पुष्प शंभरावे माझ्यावरी लक्ष तुझे असू द्यावे तुझी कृपा मजवर असेल जर होईन मी, धन्य खरोखर अतुल दिवाकर
सोमवार रविवार नंतर सोमवार घेतो ओढवून रोष थंड जातो पडून लोकांचा कालचा जोष कालचा उत्साह कालचा आनंद जातो विरून कुठल्या कुठे ज्याच्या त्याच्या अंगामधे कंटाळा कसा भरभरून साठे पण दोस्ता लक्षात घे अन् कर थोडा विचार असायला हवा तुझा आज खरे म्हणशील तर एकदम जोरदार मानशील आज जर आनंद करशील जर उत्साहाने सुरवात खात्री देतो मी तुला कंटाळा मग सोडून देईल साथ अरे सोमवार आहे म्हणून दुनिया हालते आहे बघ जरा रविवार जर असते तीन चार मग चलनवलनाचे तीन तेरा आजच्या तुझ्या उत्साहावर आयुष्य तुझे ठरणार आहे कर हर्षाने स्वागत सोमवारचे तोच तुला तारणार आहे तोच तुला तारणार आहे अतुल दिवाकर
मस्त रविवार आठवड्यातून एकच रविवार करावा मस्त आराम उशिरा पर्यंत रहावे लोळत नसावे काही काम धाम या दिवसाची वेगळीच मजा जाम खुश असते मन कंटाळा कंटाळा करत कष्टाला तयार नसते तन उशिरा उठावे, आरामात आवरावे पेपर वाचनात तासनतास घालवावे आवडीचा नाश्ता अन् गरमागरम चहा तोपर्यंत वाजतात घड्याळात दहा करावा विचार मग आंघोळीचा मनाविरूद्धच घुसावे स्नानगृहात तेथेही काढावा भरपूर वेळ स्वप्नांच्या दुनियेत जावे वहात नको वेळेची कॅलक्युलेशन्स प्रत्येक कामासाठी घड्याळाचे समन्स झुगारून सगळ्यांची सर्व बंधने ऐकावी फक्त मनाची स्पंदने एरवी चटपट हालणारे हातपाय आज होऊन जातात गोगलगाय नको वाटतात तेवढेही कष्ट उत्साह झालेला असतो नष्ट जेवणानंतर वामकुक्षी, अहाहा! काय सुख इकडून तिकडे लोळावे करून आनंदी मुख सूर्य येता अस्ताला मग उघडावे डोळे मिळावा मस्त चहा नजर हळूच किचनकडे  वळे पहावा टि व्ही वा जावे फिरावयास आज जे करू वाटे ते खास भरपूर आराम अन् सुस्ती अंगात वाटे हेच असे सुख ते जगात किती बरे पटकन रविवार हा संपतो सोमवार तो येऊन समोर ऊभा राहतो देवा मी तुझे मानीन शतशः आभार दिलेस जर आठव...
प्रतिज्ञा मी स्वतंत्र भारताचा आणि जगातील सर्वात मोठ्या लोकशाहीचा नागरीक प्रतिज्ञा करतो की मी माझे देशासाठीचे दायित्व कधीही विसरणार नाही. मी माझ्या संतांच्या ह्या भूमीचे पावित्र्य राखीन. मी माझ्यावर झालेल्या संस्काराचा ऊपयोग देशहितासाठी व माझ्या बंधू आणि भगिनींच्या उत्कर्षासाठी करीन. मी हे कायम लक्षात ठेवीन की माझा देश हा शेतीप्रधान देश आहे. माझ्या देशातील शेतकरी जर जगला तरच देश वाचेल व स्वतंत्र झाल्याचे समाधान सर्वांना लाभेल. मी माझा देश आधुनिक भारत बनविण्यासाठी माझी बुद्धी पणाला लावेन व आधुनिकता व परंपरा यांचा योग्य समतोल राखण्याचा पूर्ण प्रयत्न करेन. मी कायम देशापुढील अंतर्गत व बाह्य संकटांवर मात करण्यासाठी पुढे येईन व नव्या पिढीला ह्या संकटांशी सामना करण्यासाठी तयार करण्याचे परिश्रम घेईन. मी कायम ह्या गोष्टीची काळजी घेईन की ज्या अनेक स्वातंत्र्यसैनिकांनी देशासाठी व स्वतंत्रतेसाठी प्राणार्पण केले त्यांचे बलिदान माझ्यामुळे वाया जाणार नाही. माझ्या ह्या पुण्यभूमीला माझे कोटी कोटी प्रणाम. चिरायु भारत. अखंड भारत. भारतमाता की जय. अतुल दिवाकर 15.8.2015
वादा वठलेल्या झाडावर डोलत होते एक पान जगण्याची उमेद मनात घेऊन विपरीत परिस्थितीत उभे रहाण्याचा संदेश सर्व जगाला देऊन खडतर होते त्याचे आयुष्य दिसत नव्हता कोठेही दिलासा ना कोणी मित्र वा भाईबंद होता त्याचा स्वतःवर भरोसा एक जबरदस्त आत्मविश्वास भरपूर ओसंडून वाहत होता जरी होता नाजुक जीव टक्कर द्यायला ऊभा होता वार्‍याच्या झुळुकीवर छान होते डोलत मजेत मी जगणार जणू स्वतःशीच बोलत प्रत्येकजण त्याच्याकडे कुतुहलाने पहात होता ते जाणून आनंदाने गाल्यातल्या गालात हासत होता हा होता वेगळाच अनुभव माझ्यासाठी बरं का दादा उमेद कधीही हारायची नाही केला मी स्वतःशीच वादा अतुल दिवाकर
स्वप्न स्वप्न म्हणाले मला किती रे तू त्रास देतोस दमून भागून आल्यावर झोपायचे सोडून मला छळतोस मी म्हणालो मित्रा अरे तू का असा रडतोस त्रास होतो तुला पण माझ्या पंखाना बळ देतोस जागेपणी जे शक्य नाही ते तू चुटकीसरशी जमवतोस मनात येणारी उदासी किती पटकन घालवतोस तुझ्यामुळेच तर मला नवा विश्वास मिळतो आधार देतोस सतत म्हणून तू मला भावतो स्वप्न म्हणाले मित्रा खरचं मी चुकलो दोष दिला तुला अकारण चिडलो आता नाही रागावणार दोस्ता, मदत तुला करणार तुझ्या जीवनाचा आधार मी बनणार अतुल दिवाकर
एकीचे पति दूरदेशी कामानिमित्त गेले आहेत. खूप दिवस झाले पण त्यांची काहीच खबर नाही. त्या पत्नीची मनःस्थिती. विरह पति गेले दूरदेशी डोळ्यात आणून प्राण वाट त्यांची बघते दिवस संपता संपत नाही रात्र खायला उठते कसे असतील ते काळजी त्यांची वाटते काय करत असतील सतत चिंता सतावते घशाखाली माझ्या घास उतरत नाही घर असून भरलेले वाटते रिकामे जणूकाही राम होता वनवासात पण सवे होती सीतामाई घरातच भासे मला वनवास अन् ह्यांची काहीच खबर नाही संपव देवा ही तगमग कर कृपा माझ्यावर संपुष्टात आल्या सर्व आशा भरवसा आता फक्त तुझ्यावर अतुल दिवाकर
भावना गुलाबाच्या झाडावर एक कळी उमलली पानामागून माझ्याकडे बघून गोड हसली दिसत होती लबाड लालचुटूक रंग पाहत राहिलो तिला होऊन मी दंग तिच्यामधे फूल दडले होते एक मोहक आणि गोंडस टपोरे सुरेख म्हणाली ती मला मी आवडते का तुला मी मोठी होतांना सांभाळशील ना मला मी पूर्ण उमलल्यावर मला बाप्पाकडे ने पायाशी त्यांच्या मला ठेऊन  दे माझे भाग्य उजळेल पुण्य तुला लाभेल सार्थक दोघांच्या जीवनाचे आणि मनाला समाधान मिळेल मन आले भरून मला शब्द नाही सुचले बघून कोमल मन डोळे भरून आले अतुल दिवाकर
मन जेव्हां करतो मी डोळे बंद मिळवण्यासाठी थोडी शांतता विचारांची उसळते मनात लाट मग शांततेची लागते वाट ह्या मनाकडून घेण्यासारखा दिसतो मला चांगला गुण अविरत करत रहा कष्ट नका मानू हा अवगुण शांतता किंवा अशांतता हे तर आहेत मनाचे खेळ तुम्ही करा आयुष्य सुंदर यांचा घालून योग्य मेळ क्षणात भूत क्षणात भविष्य का रे मना देतोस ही सजा अरे जगू दे ना वर्तमानात त्यात आहे वेगळीच मजा कसा रे तू दमत नाहीस कुठली आहे तुझ्यात शक्ति मार्ग आम्हाला मिळत नाही देवाची कितीही केली भक्ति कधीही मी तुझ्याकडे आलो तर तू असतोस सतत बिझी नकोस एवढे कष्ट करूस Don't mind, take it easy अतुल दिवाकर
निशा पहाट म्हणाली रात्रीला किती ग तू काळी लोकांना घाबरवतेस वेळी अवेळी तुझ्यामुळे होतात जगात कृष्णकृत्ये तुझ्यामुळेच जमतात झाडावर भुते तुझ्या मिट्ट काळोखात वाईट लोकांची मजा तू व्हायला पाहिजेस लोकांच्या आयुष्यातून वजा का बरे तू आलीस ह्या सुंदर जगात बसलीस का नाहीस मजा करत स्वर्गात निशा म्हणाली हसून माझा रंग काळा पण लोक ज्याला पूजतात तो कृष्ण होता सावळा नको अशी तू हुशार समजूस स्वतःला माझ्यामुळेच तर तानाजीने कोंढाणा सर केला वाईट कृत्ये करायला लोकांना फरक नाही पडत जग हे पुढारलेले माझी वाट नाही बघत लोकांना विश्रांती माझ्यामुळेच तर मिळते तुझे महत्व त्यांना माझ्यामुळेच तर कळते मी आहे म्हणून तुला जगात ह्या वाली नको टेंभा मिरवूस कारण गर्वाचे घर खाली अतुल दिवाकर
पाऊस हिरव्यागार झाडावर लाल लाल फूल असे वाटतय जणू झाडाने घातलय कानात डूल क्षणात आले दाटून मेघ दिसतीये समोर पावसाची रेघ तहानलेल्या धरतीला भेटायला आला वरूणराजा क्षणात बरसला आत्ता होते ऊन, क्षणात रस्ते ओले निसर्गाची गंमत बघून मन डोले रमून गेलो बघून हा खेळ देव बरोबर साधतो ऋतुचक्राचा ताळमेळ पसरला गारवा वातावरण छान भावाने (वरूण) ठेवला बहिणीचा (धरती) मान चालली होती वाळून वसुंधरा म्हणून येऊन पाऊस जोरात बरसला अतुल दिवाकर
मी रायपूरवरून जगदलपूरला जात आहे. हा छत्तीसगढचा प्रदेश. भरपूर जंगल. पण आता पाऊस गायब. मातीची घरे. त्यावरून सुचलेली कविता शेतकरी छोट्याश्या त्या गावात मातीचे घर दारात गायी कौले छपरावर परसात खेळतयं शेतकर्‍याचे पोर लंगडी, सागरगोटे मायच्या जीवाला नाही घोर चुलीवर भाकर्‍या बडवतीये माय गोठ्यातल्या दुधाची जाड जाड साय घर झालयं शेणाने सारवून दारात फुललाय पारिजातक मोहरून सुरू झाली लगबग शेतावर जायची शेतकर्‍यांना काळजी धान्य पिकवायची जर वरूणदेव मेहरबान तर पिके राहतील ऊभी नाहीतर जातील शेतेच्या शेते झोपी अतुल दिवाकर 10.8.15
माणसं अशी का वागतात माणसं अशी का वागतात हो हो म्हणता म्हणता नाही म्हणून जातात हसता हसता रडवून जातात माणसं अशी का वागतात देता देता घेतात पण आविर्भाव देण्याचा आणतात कितीही समजावले तरीही माजतात माणसं अशी का वागतात कळून सवरून गोंधळ घालतात वर दुसर्‍यालाच बोल लावतात स्वतः त्या गावचे नाही असे दाखवतात माणसं अशी का वागतात वर वर देवाचे करतात आतून राक्षसासारखे राहतात स्वतः देव असल्यासारखे उपदेश करतात माणसं अशी का वागतात दुसर्‍यांच्या भावनांशी खेळतात आणि मग त्यांची मजा बघतात मानव असून पिशाच्यासारखे वागतात माणसं अशी का वागतात बुद्धी असून निर्बुद्धासारखे करतात मानवाचा जन्म वाया घालवतात असे वागूनही स्वतःला शहाणे समजतात माणसं अशी का वागतात अतुल दिवाकर
Some times Some times ..... I really feel pride when I read about the 7 wonders of world The Taj Mahal, The Great Wall ,The Pyramid, The Machu Picchu... I really feel pride when I see the great movies Sound of Music , Sholey, Sant Tukaram ... I really feel pride when I read some grate books Majhi Janmathep, Swami, You Can Win .... Some times .... Then I think about him . The Almighty . How he must be feeling when He created the Universe He created the Earth He created us Sometimes.... I feel ashamed when I realise our creation is of things have no life and ... We feel  so pride . He created the life and he is silent . Sometimes .... Atul Diwakar
असेच काहीतरी केल्याने होते आहे रे आधी केलेची पाहिजे ऐकून वाचून झाले पण आचरणात नाही आणले जो दुसर्‍यावरी विसंबला त्याचा कार्यभाग बुडाला स्वतःवरी विश्वास ठेवला तोच सुखी झाला खाईन तर तुपाशी नाही तर उपाशी जणू आहेत तुझ्यापाशी धनांच्या राशी नको मारूस स्वतःच स्वतःच्या पायावर कुर्‍हाड नाहीतर रस्त्यावर येईल तुझे वर्‍हाड काखेत कळसा गावाला वळसा विचार करा विसरभोळेपणा टाळणार कसा दुध गरम लागले म्हणू ताक नका फुंकून पिऊ घरोघरी हीच बोंब म्हणून नका फुशारून जाऊ ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या वाण नाही पण गुण लागला असे असुन सुद्धा तो माझ्याशीच भांडला करून सवरून भागला अन् देवपूजेला लागला अतुल दिवाकर
श्रेष्ठ राधेचे प्रेम का कृष्णाची बासरी मीरेची भक्ति का सुदामाची भाकरी कोण श्रेष्ठ कर्णाचे वचन का एकलव्याची भक्ति युधिष्ठिराचा धर्म का भिमाची शक्ति कोण श्रेष्ठ जिजाऊची दूरद्रृष्टि का फुंकलेले संसार संभाजीची जिगर का भवानी तलवार कोण श्रेष्ठ सावरकरांची उडी का लोकमान्यांची सिंहगर्जना फुलेंची शाळा का आझाद हिंद सेना कोण श्रेष्ठ पुलंचा विनोद का अत्र्यांचा चिमटा भटांची गजल का गुंड्याभाऊंचा सोटा कोण श्रेष्ठ देवानंदचा कोंबडा का शम्मीचा नाच खन्नाचा अभिनय का बच्चनचा आवाज कोण श्रेष्ठ किशोरच याॅडलिंग का लताचा आवाज रफीचा दर्द का आशाचा अंदाज कोण श्रेष्ठ अतुल दिवाकर