माणसा तुला काय हवं

जेव्हा तू जन्मतोस तेव्हा तू रडत असतोस
बाळ असतांना हवे ते मिळाले नाही की भोकाड पसरतोस

थोडा मोठा झालास की मित्रांकडे आहे ते माझ्याकडे नाही म्हणून नाराज होतोस
किंवा मनासारखे शाळा काॅलेज मिळाले नाही म्हणून आकांड तांडव करतोस

नोकरीत कष्ट खूप आहेत म्हणून कटकट करतोस
लग्नात मानपान झाले नाही म्हणून फुरंगटून बसतोस

मुलगा हवा असतांना मुलगी वा मुलगी हवी असतांना मुलगा झाला की त्रासतोस
मूल मनासारखं वागत नाही म्हणून चिडचिड करत राहतोस

कितीही पैसा असला तरी तो तुला कमीच पडतो
सजीवांपेक्षा तुझा जीव निर्जीवांवरच जास्त जडतो

कस रे तुला कळत नाही काय आणि किती घ्यावं
म्हणून मला प्रश्न पडतो की माणसा तुला नक्की काय हवं

जन्माला येतांना तू का बरे नाही हसत
जन्मापासूनच सगळ्यांपुढे वेगळा आदर्श ठेवत

लहानपणी तुझ्या दिमतीला हजर असतात ना सगळे
मग राजा असतांना हट्ट करू नये इतुकेही तुजला न कळे

आपल्यासाठी झिजतात आई वडिल याची ठेव जाणीव
भरभरून प्रेम मिळत असतांना तुला कशी रे भासते इतर गोष्टींची उणीव

वेगळा आहेस तू बुद्धीमुळे तुझ्या
इतर सर्व गोष्टी ज्ञानापुढे आहेत खुज्या

सांगितले आहे देवाने जसे कष्ट तसे फळ
धडपड करण्यासाठी देवाने तुला दिले आहे बळ

जेव्हढे करशील कष्ट जेव्हढे मिळवशील ज्ञान
करशील जग सुंदर दूर करून लोकांचे अज्ञान

इथल्या सर्व गोष्टी इथेच ठेऊन जायचे
कशाला मग पुण्यापेक्षा पापाला महत्व द्यायचे

इथे घेणारे लोक अनंत अन् देणारे बघ थोडे
पण देणार्‍यांचेच या जगात गाईले जाती गोडवे

म्हणून म्हणतो घेण्यापेक्षा देण्याला महत्व द्यावं
आता सांग माणसा तुला काय हवं

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ