जगण्याची रीत

जगणं झालयं पैशाचा खेळ
अन् आयुष्य म्हणजे भावनाची भेळ
पैसा व भावना यांचा साधेल जो ताळमेळ
सुखी होईल या जगी तो ।

समोर आहेत किती प्रलोभने
कसे ठरवू काय हवे नको ते
बुद्धी व मनाचे द्वंद्व रोजचे
सुखी तो जो जाणेल गरज काय ते ।

जीवनशैली झाली आजारपणाचा रस्ता
नकोशा झाल्या आयुष्यात खस्ता
जीव झाला किती सस्ता
सुखी होशील उत्तम आरोग्य असता ।

शिक्षणाची रीतच वेगळी
कमाईची साधने सगळी
गुणवत्ता झाली लुळीपांगळी
गुणांची शर्यत अशी ही खेळी ।

आजचे राजकारणी तोबा तोबा
सगळेच भाई, दादा वा आबा
गुंडाशी आहे ह्यांचा घरोबा
राजकारण विसरा नाहीतर एकमेकांशी झोंबा ।

अतुल दिवाकर

Comments

  1. This comment has been removed by a blog administrator.

    ReplyDelete

Post a Comment

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ