श्रेष्ठ

राधेचे प्रेम का कृष्णाची बासरी
मीरेची भक्ति का सुदामाची भाकरी
कोण श्रेष्ठ

कर्णाचे वचन का एकलव्याची भक्ति
युधिष्ठिराचा धर्म का भिमाची शक्ति
कोण श्रेष्ठ

जिजाऊची दूरद्रृष्टि का फुंकलेले संसार
संभाजीची जिगर का भवानी तलवार
कोण श्रेष्ठ

सावरकरांची उडी का लोकमान्यांची सिंहगर्जना
फुलेंची शाळा का आझाद हिंद सेना
कोण श्रेष्ठ

पुलंचा विनोद का अत्र्यांचा चिमटा
भटांची गजल का गुंड्याभाऊंचा सोटा
कोण श्रेष्ठ

देवानंदचा कोंबडा का शम्मीचा नाच
खन्नाचा अभिनय का बच्चनचा आवाज
कोण श्रेष्ठ

किशोरच याॅडलिंग का लताचा आवाज
रफीचा दर्द का आशाचा अंदाज
कोण श्रेष्ठ

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ