सुख म्हणजे काय असतं
सुख म्हणजे काय असतं
हव्या हव्याशा गोष्टी हातात मिळणं
का मन जाणणारी व्यक्ति सोबत असणं
सुख म्हणजे काय असतं
जिभेची चव भागवणार अन्न ताटात असणं
का जीवन रूचकर करणारे कोणीतरी आयुष्यात असणं
सुख म्हणजे काय असतं
हातात पैसा आणि फिरायला गाडी असणं
का कठीण परिस्थितीत आपला हात हातात धरणारं कोणी बरोबर असणं
सुख म्हणजे काय असतं
बायको मुलगा असे आदर्श जीवन असणं
का आपण दुसर्याचे जीवन आदर्श करण्यात सुख मानणं
सुख म्हणजे काय असतं
एक सुखी आणि समाधानी आयुष्य
का समाजासाठी धडपडणारं असमाधानी आयुष्य
सुख म्हणजे काय असतं
पूजापाठ आणि व्रतवैकल्ये
का माणुसकी आणि दानशूरता
अतुल दिवाकर
सुख म्हणजे काय असतं
हव्या हव्याशा गोष्टी हातात मिळणं
का मन जाणणारी व्यक्ति सोबत असणं
सुख म्हणजे काय असतं
जिभेची चव भागवणार अन्न ताटात असणं
का जीवन रूचकर करणारे कोणीतरी आयुष्यात असणं
सुख म्हणजे काय असतं
हातात पैसा आणि फिरायला गाडी असणं
का कठीण परिस्थितीत आपला हात हातात धरणारं कोणी बरोबर असणं
सुख म्हणजे काय असतं
बायको मुलगा असे आदर्श जीवन असणं
का आपण दुसर्याचे जीवन आदर्श करण्यात सुख मानणं
सुख म्हणजे काय असतं
एक सुखी आणि समाधानी आयुष्य
का समाजासाठी धडपडणारं असमाधानी आयुष्य
सुख म्हणजे काय असतं
पूजापाठ आणि व्रतवैकल्ये
का माणुसकी आणि दानशूरता
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment