इंद्राणी मुखर्जी  प्रकरण

काॅर्पोरेट जग

चेहरे गायब राज्य मुखवट्यांचे
स्वतःच स्वतःला फसवणार्‍यांचे
कोणाचेच इथे नसती लागेबांधे
आप्तांचे असती नातेवाईकांबरोबर वांदे

फसवणूक हा इथला बालवाडीचा धडा
कोणालाही इथे वेडे करून सोडा
अंगभर कपडे असून माणूस इथे उघडा
सगळ्यात कपटी माणूस असतो इथे बापुडा

पैशांच्या राशी मद्याचे सागर
संबंध म्हणजे अनैतिकतेचा कहर
जिभेवर साखर मनात जहर
डोके असती कूटनितीचे आगर

दिखावा किती याला मर्यादाच नाही
अमर्याद धुंद जगणे इथे पाही
लाज कोणालाच नसे लवलाही
बघून हे होते अंगाची लाहीलाही

तोकडे कपडे गळ्यात गळे
कोण कोणाचा कोण काहीच न कळे
बघून ही नाती देव झाले बावळे
स्वर्गलोक सोडून गेले काशीयात्रेला सगळे

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ