सार्थक

आयुष्य म्हणजे वळणा वळणांचा रस्ता
का चढ उताराचा आणि न संपणारा
शिकलेला माणूसही आहे इथे कोरा
अडाणी माणूस भरवतो भुकेलेल्यांना चारा ।

देवाने दिली होती चालायला पायवाट
वर निसर्गाची लेणी घातली होती पदरात
मानवा ! रमलास तू फक्त तुझ्याच आनंदात
तुझा हा स्वार्थच करत आहे आत्मघात ।

झुळझुळ वाहते पाणी, पक्ष्यांची किलबिल
पुनवेचा चांदोबा आकाशातील कंदिल
निसर्गाची हाक कधी रे ऐकशील
का सारे आयुष्य असेल वाया घालवशील ।

ही काळी माती तुझी आहे धरणीमाता
हो समजुतदार अन् सोड स्वार्थ आता
मुकशील नाहीतर आनंदाला तू येता जाता
द्यायला जर शिकला नाहीस तू घेता घेता ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ