मकसद
मकसद
रम्य अशा संध्याकाळी
दिनकर जाई क्षितिजावरी
पाखरे किलबिलती वृक्षांवरी
लगबग असे जाण्या घरी ।
तू असा का बसलास दुःखी होउन
डोळे ओले करून आणि मन मारून
माणूस कधी जगू शकतो का हातावर हात ठेउन
कसं फुलणार आयुष्य अशी उमेद घालवून ।
अरे ! बहर संपला की कोमेजतात फुले
पण परत परत बागा फुलतातच ना
निसर्गाचे हे चक्र आहे मित्रा !
तू पण थोडे समजून घे ना ।
चांगल्या बरोबर थोडे वाईट
जगरहाटीचा नियमच जणू
आनंदाला दुःखाचा संग
नको नको अशा भावना ताणू ।
तू कोण, मी कोण आपण इथे का आलो
कधीतरी कर विचार, काय होईल जर आपण नसलो
जग चालायच थांबणार आहे थोडीच
ते का म्हणणार आहे ... टाईम प्लीज ।
चल, घे भरारी आणि पसर पंख
नजर ठेव गरूडाकडे, विसर विषारी डंख
तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद
हाच होऊ दे तुझा आता जगण्याचा मकसद ।
अतुल दिवाकर
रम्य अशा संध्याकाळी
दिनकर जाई क्षितिजावरी
पाखरे किलबिलती वृक्षांवरी
लगबग असे जाण्या घरी ।
तू असा का बसलास दुःखी होउन
डोळे ओले करून आणि मन मारून
माणूस कधी जगू शकतो का हातावर हात ठेउन
कसं फुलणार आयुष्य अशी उमेद घालवून ।
अरे ! बहर संपला की कोमेजतात फुले
पण परत परत बागा फुलतातच ना
निसर्गाचे हे चक्र आहे मित्रा !
तू पण थोडे समजून घे ना ।
चांगल्या बरोबर थोडे वाईट
जगरहाटीचा नियमच जणू
आनंदाला दुःखाचा संग
नको नको अशा भावना ताणू ।
तू कोण, मी कोण आपण इथे का आलो
कधीतरी कर विचार, काय होईल जर आपण नसलो
जग चालायच थांबणार आहे थोडीच
ते का म्हणणार आहे ... टाईम प्लीज ।
चल, घे भरारी आणि पसर पंख
नजर ठेव गरूडाकडे, विसर विषारी डंख
तुझ्यातच आहे जग बदलण्याची ताकद
हाच होऊ दे तुझा आता जगण्याचा मकसद ।
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment