बाप्पा आले

वार्‍याच्या लहरींवरून फिरत आला प्राजक्ताचा सुवास
मन प्रसन्न केले अन् सुरू झाला आनंदी प्रवास
जिकडे पहावे तिकडे वातावरण दिसे झकास
बाप्पांच्या आगमनाने मनाला वाटू लागले खास ।।

सुंदर मुर्ती बैसली सिंहासनावरी
आनंदाने केली प्रतिष्ठापना घरोघरी
सजली बघ आरास ठेविले विडे पाटावरी
एका हाती मोदक अन् कमळ दुसर्‍या करी ।।

दुर्वांची जुडी शोभे मुकुटावरी
गळ्यात जानवे,चमकते शेल्याची ती जरी
पायापाशी बैसली जोडूनी कर उंदीरमामांची स्वारी
लाल जास्वंद बाप्पांची आवडती गोष्ट ती खरी ।।

घेऊनी दर्शन मन होते प्रसन्न खरोखर
हरपून भान होतो नतमस्तक मी पामर
सात्विकतेचे भाव पसरले सर्वत्र दूरवर
बाप्पा आले अन् धरती नटली सुंदर ।।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ