विज्ञान आणि धर्म

एकाचा पाया सिद्धांताचा
तर दुसर्‍याचा परंपरेचा

विज्ञान म्हणजे शक्ति
तर धर्म म्हणजे भक्ति

विज्ञान डोळ्याने बघते
धर्माला डोळ्यापलिकडचे दिसते

विज्ञान अनेक लोकांना कामाला लावते
तर धर्माने वागले तर देवाला भावते

विज्ञान प्रश्नांची उत्तरे शोधते
धर्म नवनवीन प्रश्न पाडते

एकामधे उत्साह तर एकामधे रस
दोघेही आपापल्या ठिकाणी सरस

विश्वास म्हणजे धर्म
विज्ञान म्हणजे कर्म

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ