असे होते पुणे
असे होते पुणे
चौसोपी वाडे होते, वाड्यापुढे परसबाग
प्राजक्ताचा सडा अन् कोंबड्याची बांग
देवळातील काकडआरतीने यायची जाग
झाडांची होती रेलचेल वड,पिंपळ आणि साग
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
रस्ते होते छोटे आजूबाजूला झाडी होती
सातनंतर कोथरूडला जायला वाटायची भिती
एकटे जावे लागले तर धडधडायची छाती
डांबर होते कमी अन् रस्त्यावर होती माती
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
चालत चालत जायची शाळेमध्ये मुले
फक्त काहीजणांच्या हाती सायकल खुले
जाई, जुई, मोगरा, चाफा होती बागेत फुले
वडाच्या झाडांना सणात लागायचे झुले
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
गणेशोत्सव होता पुण्याची शान
चतुशृंगीच्या जत्रेत खेळायची मुले लहानसान
दुचाकीच्या शहरात होता टांग्याला मान
अॅम्बॅसिडर होती श्रीमंतांची जान
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
लंगडी, खो खो, चोर पोलीस हे होते खेळ
रस्त्यावर वाहतुकीचा होता ताळमेळ
चटकदार पदार्थ म्हणजे होती भेळ
सर्वांचे आवडते फळ म्हणजे होते केळ
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
ओळखले जायचे हे पेन्शनंरांचे शहर
हिवाळ्यात असायचा थंडीचा कहर
होती पुण्यनगरी आमची विद्येचे माहेरघर
नव्हती फ्लॅटसिस्टीम रहायला कौलारू घर
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
डोक्यावर होती पगडी, हातात भरीव काठी
एकत्र होते कुटुंब,घरात दाटीवाटी
जेवढी कडक शिस्त, तेवढीच होती माया
घरावर असायची वडिलधाऱ्यांची छाया
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
अतुल दिवाकर
चौसोपी वाडे होते, वाड्यापुढे परसबाग
प्राजक्ताचा सडा अन् कोंबड्याची बांग
देवळातील काकडआरतीने यायची जाग
झाडांची होती रेलचेल वड,पिंपळ आणि साग
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
रस्ते होते छोटे आजूबाजूला झाडी होती
सातनंतर कोथरूडला जायला वाटायची भिती
एकटे जावे लागले तर धडधडायची छाती
डांबर होते कमी अन् रस्त्यावर होती माती
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
चालत चालत जायची शाळेमध्ये मुले
फक्त काहीजणांच्या हाती सायकल खुले
जाई, जुई, मोगरा, चाफा होती बागेत फुले
वडाच्या झाडांना सणात लागायचे झुले
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
गणेशोत्सव होता पुण्याची शान
चतुशृंगीच्या जत्रेत खेळायची मुले लहानसान
दुचाकीच्या शहरात होता टांग्याला मान
अॅम्बॅसिडर होती श्रीमंतांची जान
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
लंगडी, खो खो, चोर पोलीस हे होते खेळ
रस्त्यावर वाहतुकीचा होता ताळमेळ
चटकदार पदार्थ म्हणजे होती भेळ
सर्वांचे आवडते फळ म्हणजे होते केळ
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
ओळखले जायचे हे पेन्शनंरांचे शहर
हिवाळ्यात असायचा थंडीचा कहर
होती पुण्यनगरी आमची विद्येचे माहेरघर
नव्हती फ्लॅटसिस्टीम रहायला कौलारू घर
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
डोक्यावर होती पगडी, हातात भरीव काठी
एकत्र होते कुटुंब,घरात दाटीवाटी
जेवढी कडक शिस्त, तेवढीच होती माया
घरावर असायची वडिलधाऱ्यांची छाया
नव्हते काही उणे
एकेकाळी असे होते पुणे
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment