माणसं अशी का वागतात

माणसं अशी का वागतात
हो हो म्हणता म्हणता नाही म्हणून जातात
हसता हसता रडवून जातात
माणसं अशी का वागतात

देता देता घेतात
पण आविर्भाव देण्याचा आणतात
कितीही समजावले तरीही माजतात
माणसं अशी का वागतात

कळून सवरून गोंधळ घालतात
वर दुसर्‍यालाच बोल लावतात
स्वतः त्या गावचे नाही असे दाखवतात
माणसं अशी का वागतात

वर वर देवाचे करतात
आतून राक्षसासारखे राहतात
स्वतः देव असल्यासारखे उपदेश करतात
माणसं अशी का वागतात

दुसर्‍यांच्या भावनांशी खेळतात
आणि मग त्यांची मजा बघतात
मानव असून पिशाच्यासारखे वागतात
माणसं अशी का वागतात

बुद्धी असून निर्बुद्धासारखे करतात
मानवाचा जन्म वाया घालवतात
असे वागूनही स्वतःला शहाणे समजतात
माणसं अशी का वागतात

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ