आयुष्यरुपी भेळ
आयुष्यरूपी भेळ
मानवाचे आयुष्य
जणू चित्रपटाचा खेळ
चांगल्या वाईट घटनांची
ही आहे छान भेळ
छोट्या छोट्या कुरबुरी
एक महत्वाचे अंग
आयुष्यरूपी भेळेचे
जणू कुरकुरीत भडंग
थोडासा अबोला
आणि मग मनधरणी
दुराव्याच्या तिखटावरचे
हे आहे गोड पाणी
नात्यांमधील दुरावा
म्हणजे मिरचीचा ठेचा
हा फक्त नावाला
कटुता नको टिकायला
हिरवीगार कोथिंबीर
देई तिखट भेळेला थंडावा
नात्यांमधे तसाच
प्रेमरस असावा
विसरू कसे फरसाण
भेळ बनवी चटकदार
पत्नी आणि दोस्त
जीवनाचे जोडीदार
ह्यात भरले ओतप्रोत
अनेक रंग अनेक रस
सगळ्यांचे आहे महत्व
अथवा आयुष्य होईल नीरस
अतुल दिवाकर
मानवाचे आयुष्य
जणू चित्रपटाचा खेळ
चांगल्या वाईट घटनांची
ही आहे छान भेळ
छोट्या छोट्या कुरबुरी
एक महत्वाचे अंग
आयुष्यरूपी भेळेचे
जणू कुरकुरीत भडंग
थोडासा अबोला
आणि मग मनधरणी
दुराव्याच्या तिखटावरचे
हे आहे गोड पाणी
नात्यांमधील दुरावा
म्हणजे मिरचीचा ठेचा
हा फक्त नावाला
कटुता नको टिकायला
हिरवीगार कोथिंबीर
देई तिखट भेळेला थंडावा
नात्यांमधे तसाच
प्रेमरस असावा
विसरू कसे फरसाण
भेळ बनवी चटकदार
पत्नी आणि दोस्त
जीवनाचे जोडीदार
ह्यात भरले ओतप्रोत
अनेक रंग अनेक रस
सगळ्यांचे आहे महत्व
अथवा आयुष्य होईल नीरस
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment