मन

मन

मन हे माझे फुलपाखरू झाले
भावनांचे रंग पंखात भरले
मन झाले तळे, पाणी त्यात आले
निचरा न होता भाव साचून राहिले

मोकळ्या वार्‍यावर, फिरून मन आले
टाकून आले ओझे, हलके हलके झाले
आनंदाचे गुपित, त्याचे त्यालाच कळाले
गोष्टी विसरून गेले, कसे सुखी मग झाले

मन सिंह झाले कधी, डरकाळ्या हाय हाय
कधी लपून बसले ... शंखातील गोगलगाय
किती रूपे तू रे घेशी, जरा मला सांग मना
तुझ्या रूपा रूपात आहे एक छानसा गोडवा

मन माझे सज्जन, नाही दुर्गुणांचा गंध
आपणच त्याने घातले स्व ला सगुणाचे बंध
जरी सोडले बेलगाम नाही नाही उंडारले
गुरूच्या पायापाशी त्याने स्वतःला ठेवले

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ