माय मराठी

माय मराठी

माझी माय मराठी, आहे मला अभिमान
तिने वाढविले मला, दिले अनेक सन्मान
तिच्या कुशीत शिरून माझा दिवस जातो छान
माझी माय मराठी खरेच आहे खूप महान

मी तिचा सान सोशिक माझी माय
काना मात्रा उकार शिकेपर्यंत वाट पहाय
मी एक प्राणी मला दिले तिने नाव
अक्षर ओळख झाली वाढला माझा भाव

अक्षराचे वाक्य, वाक्याचे निबंध झाले
तिच्यामुळेच मला बक्षीस देखील मिळाले
रंगविल्या तिने चर्चासत्रे अन् सभा
तिच्यामुळेच ह्या जगात मी ठाम उभा

ठेव अशीच सदा कृपा आम्हावरी तू माय
कृपावंत मी लेकरू तुझे तुझी स्तुती गाय
चिरकाल तू असणार अंतापर्यंत जगाच्या
कृतज्ञ तुझा मी ह्या भावना अंतरीच्या


अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ