आधार

किती छान होईल जर मेंदू ब्लाॅक झाला तर
मिळेल थोडा आराम सुट्टी चार दिवस वर
विचांराना नाही राहणार हक्काचे घर
कदाचित मग हृदय हळूच डोके काढील वर

रात्र असो वा दिवस नाही फरक पडणार
पुढे किंवा मागे मेंदू नाही बघणार
नाही त्याला कधीच प्रश्न आता पडणार
जगण्याचे गणित कोण आता मांडणार

हृदयाची साद किती दिवस पुरणार
भावनेवर कसे आणि दिवस जगणार
शब्दांचे खेळ आपण का खेळणार
चलनवलन आपले नाही ना थांबणार

हृदय आहे ऊर्जा तर मेंदू आहे स्त्रोत
जीवनरूपी दिव्याची ही आहे ज्योत
मी आहे खलाशी आयुष्यरूपी होडीचा
जगण्यासाठी आधार मला ह्या जोडीचा

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ