एकीचे पति दूरदेशी कामानिमित्त गेले आहेत. खूप दिवस झाले पण त्यांची काहीच खबर नाही. त्या पत्नीची मनःस्थिती.
विरह
पति गेले दूरदेशी
डोळ्यात आणून प्राण वाट त्यांची बघते
दिवस संपता संपत नाही
रात्र खायला उठते
कसे असतील ते
काळजी त्यांची वाटते
काय करत असतील
सतत चिंता सतावते
घशाखाली माझ्या
घास उतरत नाही
घर असून भरलेले
वाटते रिकामे जणूकाही
राम होता वनवासात
पण सवे होती सीतामाई
घरातच भासे मला वनवास
अन् ह्यांची काहीच खबर नाही
संपव देवा ही तगमग
कर कृपा माझ्यावर
संपुष्टात आल्या सर्व आशा
भरवसा आता फक्त तुझ्यावर
अतुल दिवाकर
विरह
पति गेले दूरदेशी
डोळ्यात आणून प्राण वाट त्यांची बघते
दिवस संपता संपत नाही
रात्र खायला उठते
कसे असतील ते
काळजी त्यांची वाटते
काय करत असतील
सतत चिंता सतावते
घशाखाली माझ्या
घास उतरत नाही
घर असून भरलेले
वाटते रिकामे जणूकाही
राम होता वनवासात
पण सवे होती सीतामाई
घरातच भासे मला वनवास
अन् ह्यांची काहीच खबर नाही
संपव देवा ही तगमग
कर कृपा माझ्यावर
संपुष्टात आल्या सर्व आशा
भरवसा आता फक्त तुझ्यावर
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment