द्वंद

द्वंद चाले मनात माझ्या बुद्धिचे अन् हृदयाचे
मिळत नाही उत्तर मजला ह्या एका प्रश्नाचे
जिंकायाचे कोणी अन् कोणी यात हरायचे
विचारातच कदाचित ह्या आयुष्य हे संपायचे ।

एक आहे विचारवंत, भावनाप्रधान दुसरा
एक चाले तर्काने , हळुवार मनाचा दुसरा
लोहपुरूष बिरूद मिरवे एक अभिमानाने
धडधड होते दुसर्‍याची, इतरांच्या काळजीने ।

कळेना मज व्यथा म्हणावे का हा आशिर्वाद
साधावा मी या दोघांमध्ये कसा बरे संवाद
गुपित कसे हे उलगडेल मज सांगेल का कोणी
एक मला कठोर बनवे, दुसरा आणतो लोचनी पाणी ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ