आजकाल आपण आपल्या जुन्या सवयी किंवा गोष्टींमधे रमतो. त्या कशा छान आणि आताच्या कशा वाईट याची चर्चा करतो. त्याबद्दलचा एक दृष्टीकोन.
आधुनिकता
आपल्याला हवी भाजी भाकरी
आपल्याला हवी आजीची माया
आपल्याला हवे एकत्र कुटुंब
पण नको आपल्याला आधुनिकतेची छाया
मुलांनी आपले ऐकले पाहिजे
रोज रोज पाढे घोटले पाहिजे
पूजा संध्या केलीच पाहिजे
पण कास आधुनिकतेची सोडली पाहिजे
घराभोवती बाग हवीच
घरातला कर्ता तो मीच
माझे महत्व टिकायला हवे
बायकोने मात्र घरातच रहायला हवे
का बरे रमतोस भूतकाळात तू
आधुनिक जगाबद्दल ठेऊन मनात किंतू
धर नव्या जगाची कास
असू दे तुझ्या मनात विश्वास
विज्ञानाची साथ तुझ्यासाठीच
मानवतेच्या कल्याणासाठीच
पण त्याला बदनाम केले तूच
आणि वर बोंब मारतोस तूच
टीव्ही आला अन् तू घराघरात पोहोचलास
मोबाईलमुळे तू रेंजमधे आलास
इंटरनेटमुळे तू सर्वत्र फिरलास
मग आधुनिकतेला तू का रे त्रासलास
मर्म आनंदाचे ऐक सांगतो
सुखी तो जो यांचा सदुपयोग करतो
जो माणूस व्यसनाधीन होतो
या जगी तो दुःखीच होतो
अतुल दिवाकर
आधुनिकता
आपल्याला हवी भाजी भाकरी
आपल्याला हवी आजीची माया
आपल्याला हवे एकत्र कुटुंब
पण नको आपल्याला आधुनिकतेची छाया
मुलांनी आपले ऐकले पाहिजे
रोज रोज पाढे घोटले पाहिजे
पूजा संध्या केलीच पाहिजे
पण कास आधुनिकतेची सोडली पाहिजे
घराभोवती बाग हवीच
घरातला कर्ता तो मीच
माझे महत्व टिकायला हवे
बायकोने मात्र घरातच रहायला हवे
का बरे रमतोस भूतकाळात तू
आधुनिक जगाबद्दल ठेऊन मनात किंतू
धर नव्या जगाची कास
असू दे तुझ्या मनात विश्वास
विज्ञानाची साथ तुझ्यासाठीच
मानवतेच्या कल्याणासाठीच
पण त्याला बदनाम केले तूच
आणि वर बोंब मारतोस तूच
टीव्ही आला अन् तू घराघरात पोहोचलास
मोबाईलमुळे तू रेंजमधे आलास
इंटरनेटमुळे तू सर्वत्र फिरलास
मग आधुनिकतेला तू का रे त्रासलास
मर्म आनंदाचे ऐक सांगतो
सुखी तो जो यांचा सदुपयोग करतो
जो माणूस व्यसनाधीन होतो
या जगी तो दुःखीच होतो
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment