समाधान

समाधान

माणसाचा संघर्ष काही केल्या थांबत नाही
आल्यापासून जाईपर्यंत कष्ट काही संपत नाही
कितीही मिळाले तरी समाधान काही होत नाही
समजावून सांगितले पण कळाले तरी वळत नाही ।

कळणार कधी तुला इप्सित जीवनाचे
कधी होईल समाधानी जीवन मानवाचे
कसे थांबेल चक्र मानवा विफलतेचे
का हवे आहे तुला काही मंत्र सफलतेचे ।

अंथरूण पाहून पाय पसरावे
कष्टाचे जीवन मानवा तू जगावे
ऐकावे जनाचे करावे मनाचे
मिळाले ते आनंदाने घ्यावे ।

खाईन तर तुपाशी नाहीतर उपाशी
तुपाची जणू खाणच आहे तुझ्यापाशी
होशील का सुखी तू राहून अधाशी
विचारांमधे परिपक्वता आण जराशी ।

तूच आहेस तुझ्या जीवनाचा शिल्पकार
अंतर्मुख होउन जरा विचार कर एकवार
काखेत कळसा अन् गावाला वळसा
भानावर ये रे मानवा जरासा ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ