आज अचानक असे काय झाले
हसता हसता नयन भरून आले
प्रकाशात तिमिर दिसू लागले
करावे काय काहीच कळेनासे झाले ।

रंग माणसांचे कसे बदलून गेले
नको ते रंगच का दिसू लागले
आश्चर्याचे धक्के बसू लागले
अशक्य वाटे ते शक्य होताना दिसले ।

नशीब देवाने दिले फक्त एकच मन
जास्त असते तर.. कल्पनेनेच थरथरते तन
किती सोसावे याची गणतीच नाही
सहनशक्तीचा अंत कसा होत नाही ।

आक्रंदित राहिलो माझा मीच एकटा
ना मिळे रस्ता ना दिसती वाटा
नागमोडी ही वाट संपेल का कधी
का संपेल हे जीवनच मार्ग मिळण्याआधी ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ