प्रेमगीत
प्रेमगीत
उलगडत गेले सारे
मज गुपित गं प्रेमाचे
नयनात तुझिया मजला
दिसे द्वार अपुल्या विश्वाचे
तू हसता मजला भासे
जिंदगीचे सगळे फासे
आज्ञेत चालती माझ्या
गुलामच असती जसे
मोहकता तुझ्या चेहर्याची
वाढवे खोडसाळ बट केसांची
अन् हृदयी फुलता वसंत
डोलती फुले प्रेमाची
गोडवा अपुल्या नात्याचा
जणू चंद्रच तो पुनवेचा
जोडी तुझी न् माझी
मी चंद्र तू चांदणी शुक्राची
अतुल दिवाकर
उलगडत गेले सारे
मज गुपित गं प्रेमाचे
नयनात तुझिया मजला
दिसे द्वार अपुल्या विश्वाचे
तू हसता मजला भासे
जिंदगीचे सगळे फासे
आज्ञेत चालती माझ्या
गुलामच असती जसे
मोहकता तुझ्या चेहर्याची
वाढवे खोडसाळ बट केसांची
अन् हृदयी फुलता वसंत
डोलती फुले प्रेमाची
गोडवा अपुल्या नात्याचा
जणू चंद्रच तो पुनवेचा
जोडी तुझी न् माझी
मी चंद्र तू चांदणी शुक्राची
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment