आधार

आधार

असावं कुणीतरी शब्द डोळ्यातले वाचणारे
हात हातात घेउन, बुडतांना वाचवणारे
एक तरी खांदा हवा डोके टेकवायला
हो पुढे बिंधास्त,म्हणेल की मी आहे वाचवायला

माझा आनंद दिसतो त्याला मी न दाखवता
होतो तो दुःखी, मला दुःख होता
भावनांच्या झोक्यामध्ये माझ्याबरोबर झोका घ्यायला
खरचं, हवा एक खांदा मला आधार द्यायला

आवडेल मला त्याच्याबरोबर माझं मन मोकळं करायला
सांगायला मनाच्या कोपर्‍यातील, गोष्टी चार दडवलेल्या
समजून घेईल मनःस्थिती जो अन् नाही तो उपदेश द्यायला
खरचं, हवा एक खांदा मला हक्क दाखवायला

करेल जो जागे, सुषुप्तितून मला
चैतन्यमयी करेल जो निचेत अशा जगण्याला
ज्याच्यामुळे अर्थ येईल आयुष्याला
खरचं, हवा एक खांदा मला आधार द्यायला

जेवढा करतो विचार तेवढे मला कळले
आधाराचे गुपित तर माझ्यातच दडले
मीच तो जो देणार आधाराचा खांदा
आत्मविश्वास ठेवा अन् आनंदाने नांदा

अतुल दिवाकर

सुषुप्ति - गाढ झोप, निस्वप्न निद्रा
निचेत - बेशुद्ध

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ