भेट

भेट

भेट, किती छान शब्द दोन अक्षरी
हरवलेल्यांना एकत्र आणणारी
आसुसलेल्यांना आनंदी करणारी
आणि टाळणार्‍यांना ठकवणारी

भेट, म्हटलं तर एखादी दृश्य वस्तू
नाहीतर येतेस माझ्यासमोर तू
प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष विचारात
कसेही असले तरी घर करते मनात

भेट, कधी तिची आठवणच आनंदी करणारी
कधी नुसतीच आठवणीत राहणारी
कधी धुंदी चढवणारी
तर कधी खाडकन धुंदी उतरवणारी

भेट, आवडत्या व्यक्तिंची हवी हवीशी
अन् नावडत्या लोकांची नको नकोशी
म्हटलं, तर खूप वेळ घेणारी
वा कितीही वेळ दिला तरी कमीच, असं वाटणारी

भेट, कजाग माणसांचा मतलब साधणारी
तर कधी काहीच साध्य न करणारी
मला मात्र भेट हवी आहे अशी
जी भेटवेल मला माझ्यातलाच स्वतःशी ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ