मध्यमवर्गीय माणसाचे मनोगत
मध्यमवर्गी माणसाचे मनोगत
मनातले प्रश्न
विचारू मी कोणाला
सोयरसुतक एकमेकांचे
नाही ह्या जगाला
दबून जगण्यात इथे
जन्म माझा गेला
डोके वर करता
शिरच्छेदच झाला
गुंडांची गुंडगिरी
राजकारण्यांची दडपशाही
बेसुमार महागाई
जगण्यात राम राहिला नाही
नवी पिढी वेगळ्याच
विश्वात असे दंग
बेफिकीर वागणे
रोजच्या जगण्याचे अंग
सुशिक्षित म्हणणारे
सर्रास तोडतात नियम
समजावयास जाता
साद घालतो यम
उदंड झाले धंदे
अन् शिक्षणाचे वांदे
पडलेले खांदे
नामर्द झाले समदे
बदलण्यास ही स्थिती
विश्वास हवा नवा
पृथ्वीवर लवकरच
शिवाजी राजा यायला हवा
अतुल दिवाकर
मनातले प्रश्न
विचारू मी कोणाला
सोयरसुतक एकमेकांचे
नाही ह्या जगाला
दबून जगण्यात इथे
जन्म माझा गेला
डोके वर करता
शिरच्छेदच झाला
गुंडांची गुंडगिरी
राजकारण्यांची दडपशाही
बेसुमार महागाई
जगण्यात राम राहिला नाही
नवी पिढी वेगळ्याच
विश्वात असे दंग
बेफिकीर वागणे
रोजच्या जगण्याचे अंग
सुशिक्षित म्हणणारे
सर्रास तोडतात नियम
समजावयास जाता
साद घालतो यम
उदंड झाले धंदे
अन् शिक्षणाचे वांदे
पडलेले खांदे
नामर्द झाले समदे
बदलण्यास ही स्थिती
विश्वास हवा नवा
पृथ्वीवर लवकरच
शिवाजी राजा यायला हवा
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment