सोमवारची सकाळ

सोमवारची सकाळ म्हणजे सेकंदाचा हिशोब
त्यात ट्रॅफिक जाम म्हणजे सगळीच बोंबाबोंब
मनाची घालमेल अन् हृदयाची धडधड
गाडी चालवणार्‍याची मग उडते गडबड ।।

हाॅर्नचे आवाज तोंडात शिवी
रस्त्यावरील कंडिशन बंपरला बंपर लावी
थोडीशी जागा लगेच घुसव गाडी
जणू प्रत्येकजण घुसण्याचा संकल्प सोडी ।।

रस्त्याची अवस्था वर्णन करू कोठवर
पहिल्याच पावसात खड्डे खड्ड्यावर
गाडीत बसणार्‍यांना नौकेची मजा
गाडी चालवणार्‍याला जन्मठेपेची सजा ।।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ