बीज
बीज
बरेच झाले उपदेशाचे डोस
आता कृती झालीच पाहिजे
ज्ञानात भर तर रोजच पडते
आचरणात ज्ञान आणलेच पाहिजे ।
माहित असते चुकीचे खातो
खा खा ही थांबवली पाहिजे
सुटलेले पोट किंवा काळवंडलेले ओठ
माणसाने नाहीतर बाळगले पाहिजे ।
चुकीचा दिनक्रम अनुसरत असतोस
फळे त्याची भोगलीच पाहिजेत
नाहीतर करून शिस्तीचे पालन
आरोग्याची घडी बसवली पाहिजे ।
मनाची शांती विसरतोस वेड्या
दुर्लक्षाचे परिणाम सोसलेच पाहिजेत
अथवा ऐकून मनाचे सांगणे
जीवन आनंदी केले पाहिजे ।
पैसा पैसा करून तू
कमावलेस काय विचार कर
अशाश्वत गोष्टीच्या मागे लागून
पुण्य कमावयाच्या संधी विसर ।
भर तारूण्यात झालास म्हातारा
बनवलेस स्वतःला पापाचा घडा
जेव्हा येईल हाती काठी
तेव्हाच का तू शिकणार आहेस धडा ।
कळले असेल जर सार तुला
शुभस्य शीघ्रम लाग कामाला
जेव्हा बदलशील तू स्वतःला
बीज सुखाचे रोवलेस मुला ।
अतुल दिवाकर
बरेच झाले उपदेशाचे डोस
आता कृती झालीच पाहिजे
ज्ञानात भर तर रोजच पडते
आचरणात ज्ञान आणलेच पाहिजे ।
माहित असते चुकीचे खातो
खा खा ही थांबवली पाहिजे
सुटलेले पोट किंवा काळवंडलेले ओठ
माणसाने नाहीतर बाळगले पाहिजे ।
चुकीचा दिनक्रम अनुसरत असतोस
फळे त्याची भोगलीच पाहिजेत
नाहीतर करून शिस्तीचे पालन
आरोग्याची घडी बसवली पाहिजे ।
मनाची शांती विसरतोस वेड्या
दुर्लक्षाचे परिणाम सोसलेच पाहिजेत
अथवा ऐकून मनाचे सांगणे
जीवन आनंदी केले पाहिजे ।
पैसा पैसा करून तू
कमावलेस काय विचार कर
अशाश्वत गोष्टीच्या मागे लागून
पुण्य कमावयाच्या संधी विसर ।
भर तारूण्यात झालास म्हातारा
बनवलेस स्वतःला पापाचा घडा
जेव्हा येईल हाती काठी
तेव्हाच का तू शिकणार आहेस धडा ।
कळले असेल जर सार तुला
शुभस्य शीघ्रम लाग कामाला
जेव्हा बदलशील तू स्वतःला
बीज सुखाचे रोवलेस मुला ।
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment