सोक्षमोक्ष

सोक्षमोक्ष

शिक्षणाची अवस्था आज कशी झाली
शिकूनही अडाण्यांची भाऊगर्दी झाली
निरर्थक चर्चांमधे बुद्धीची चुणुक दाखवावी
शिकून आम्ही अशी उंची गाठावी ?

शिकून सवरून आता
गणित बदलले गरजेचे
माणसाच्या जीवनापेक्षा
महत्व जास्त मृत्युच्या चर्चेचे ।

जाणारा जातो त्याचे दुःख कोणा
मिडिया नावाचा इथे आहे एक बडगा
ठरवाल तसे तो रंग आणेल घटनेला
ऐकणारे, बघणारे दोष द्यावा तरी कोणाला ।

विचारवंतांची फळी जणू गायबच झाली
उथळ झाले शिक्षण, फळे भोगा त्याची
टिळक, आगरकर, सावरकर, गोखले
हे सर्व जणू आता इतिहास जमाच झाले ।

कुठे चालले जग, देवा तुला तरी माहीत आहे ?
का हे असे होणे ही तुझीच मर्जी आहे
तुला आता करतो एवढी एकच विनंती
सोक्षमोक्ष लाव बाबा, कारण अति तेथे माती ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ