स्वागत नववर्षाचे

स्वागत नववर्षाचे

जीवन आपले प्रवाही करा
सळसळते आयुष्य हाच आनंद खरा
जीवनात सतत उत्साह धरा
प्रत्येक दिवस साजरा करा ।

गेलेल्या दिसांचे दुःख आता विसरा
येते दिवस आणतील आनंदाचा झरा
फाजील उत्साह मात्र नक्की आवरा
येईल मग सुख समाधान घरा ।

येणार आहे आता नवीन वर्ष
घेउन दोन्ही दोन्ही हातांनी हर्ष
कमी होईल सामान्य माणसांचा संघर्ष
होणार मानवतेला प्रेमाचा स्पर्श ।

चला उठा कामाला लागा
माणसाला द्या माणुसकीचा धागा
प्रेमाने विणून टाका या संपूर्ण जगा
नका रिकामी सोडू इंचभरही जागा ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ