विश्वास
विश्वास
सागराच्या लाटेवरून मृतदेह आला
तरंगत येउन तो किनार्यावर विसावला
बघून ते दृश्य, काळीज हेलावले
आपल्या लेकरांचे प्रताप पाहून, देवा ! तुझेसुद्धा डोळे असतील ना पाणावले ।
ह्यांच्यासाठी वसवलीस का देवा तू वसुंधरा
मानवांना धाडलेस पृथ्वीवर देउन संस्कार खरा
आज तेच कसे उठले एकमेकांच्या जीवावर
जनावरे बरी, कसा ठेउ विश्वास माणसावर ।
माणुसकीचा एकच धर्म देवा तू सांगितला
माणसाने स्वतःसाठी धर्माचा बाजार मांडला
अनेक धर्म अनेक जाती, माणूस यातच अडकला
स्वार्थापोटी बघ आज माणूस माणुसकीला विसरला ।
कोठे जाउन तू संपवणार आहेस हे चक्र
का माणूसच संपवेल मानवजात समग्र
त्या वेळेची का तू वाट पहात आहेस
का ही परिस्थिति बघून यायलाच घाबरतो आहेस ।
तुला म्हणतो आम्ही देव त्याची ठेव जरा बूज
हवेतर करा देवांनो आपापसात करा तुम्ही हितगूज
पण यावर पक्का मार्ग आता काढायलाच हवा
देवपणावर लोकांचा परत विश्वास बसवायला हवा ।
अतुल दिवाकर

Comments
Post a Comment