गुणदोष
गुण म्हणाले दोषाला का रे तू जन्मला
नसता जर तू भूमीवर मानव असता किती चांगला
तुझ्यामुळे रे तंटा होई दुष्टता पसरवी तू
भल्याभल्यांना कळत नाही तुझ्या येण्याचा हेतू ।
मानवाची प्रगति होते मी येथे असण्याने
सर्वदूर ती पसरे शांती तू इथे नसण्याने
येताच तू कळे जगाला अस्तित्व तुझ्या असण्याचे
कळेना मज काय मिळे तुज फलित अशा वागण्याचे ।
दोष वदला का रे करसी गर्व स्वतःच्या स्वभावाचा
स्वतःच स्वतःला उच्च ठरविसी मज दिसे हा दोष तुझा
माझ्यामुळेच तुझी ओळख कसे तू हे विसरला
का आपल्याच मस्तीमध्ये इतका तू दंग झाला ।
मान्य मला रे मी न् चांगला घाबरती लोक मला
करती पूजा तुझी सगळे, मी नकोसा कोणाला
सांग मला रे तुझ्यामुळे, कोण इथे जन्मला
माझ्यामुळे बघ ह्या भूमीवर देव जातसे पूजिला ।
अतुल दिवाकर

Comments
Post a Comment