बाप्पा
बाप्पा तुमच बरंय, दहा दिवस राहून तुम्ही निघालात
इथला त्रास तुम्ही फक्त दहाच दिवस सोसलात
आम्हाला इथे असेच टाकून असे कसे तुम्ही जाणार
आमची सगळी दुःखे तुम्ही नाही तर कोण ऐकणार ।
बाप्पा तुम्ही विद्येची देवता
तुमच्या कडे आहेत चौषष्ट कला
चुका पोटात घेणारे लम्बोदर तुम्ही
म्हणून का लोकांनी तुमचा बाजार मांडला ।
विघ्नहर्त्या आमचा त्रास कधी संपवणार
का आम्हाला तू इथे असाच मारणार
हा धांगडधिंगा अन् ही अरेरावी
सहनशीलतेचा अंत बघणार तरी किती।
गजकर्णा तुझ्यासमोर उभ्या राहतात स्पीकर्सच्या भिंती
त्याच्या आवाजाने तरी उतरेल का तुझी भ्रांती
सुशिक्षित समाजाचे बघून हे आचरण
वाटत असेल तुला यावे सीतेसारखे मरण ।
गणेशा त्यापेक्षा जरा घे तू मनावर
ह्या so called भक्तांना जरा घे फैलावर
दाखवून दे त्यांना कसा असतो तुझा राग
येउ दे ह्या कुंभकर्णांना एकदाची जाग ।
अतुल दिवाकर
बाप्पा तुमच बरंय, दहा दिवस राहून तुम्ही निघालात
इथला त्रास तुम्ही फक्त दहाच दिवस सोसलात
आम्हाला इथे असेच टाकून असे कसे तुम्ही जाणार
आमची सगळी दुःखे तुम्ही नाही तर कोण ऐकणार ।
बाप्पा तुम्ही विद्येची देवता
तुमच्या कडे आहेत चौषष्ट कला
चुका पोटात घेणारे लम्बोदर तुम्ही
म्हणून का लोकांनी तुमचा बाजार मांडला ।
विघ्नहर्त्या आमचा त्रास कधी संपवणार
का आम्हाला तू इथे असाच मारणार
हा धांगडधिंगा अन् ही अरेरावी
सहनशीलतेचा अंत बघणार तरी किती।
गजकर्णा तुझ्यासमोर उभ्या राहतात स्पीकर्सच्या भिंती
त्याच्या आवाजाने तरी उतरेल का तुझी भ्रांती
सुशिक्षित समाजाचे बघून हे आचरण
वाटत असेल तुला यावे सीतेसारखे मरण ।
गणेशा त्यापेक्षा जरा घे तू मनावर
ह्या so called भक्तांना जरा घे फैलावर
दाखवून दे त्यांना कसा असतो तुझा राग
येउ दे ह्या कुंभकर्णांना एकदाची जाग ।
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment