मी कामगार
मी कामगार,
दिवस रात्र करतो कष्ट, हटत नाही मागे
कष्ट हेच माझे जीवन, जोडती संसाराचे धागे
पोटात दोन घास जाताच सार्थक होई कष्टाचे
नाही काही मोठी आस, नको बंगले मजल्यांचे
मी कामगार,
आपत्तींचा डोंगर जरी उभा समोर
मार्ग काढतो ठेउन, विश्वास मी स्वतःवर
नाही रहात अवलंबून मी इथे कोणावर
जगण्याचा हाच, मंत्र ठेवतो समोर
मी कामगार,
जगतो मी आजमध्ये चिंता नाही उद्याची
उद्या कोणी बघितला,पर्वा कशाला भविष्याची
सुखी समाधानी मी जरी जिंदगी साच्याची
हसतो श्रीमंतांच्या डोळ्यात बघून लकेर काळजीची
मी कामगार,
मर्म बापा जगण्याचे समजले का कोणाला
सार आयुष्याचे समजवायचे आपणच आपणाला
पृथ्वीवर हरेक जण आहे बघ कामगार
प्रत्येकालाच आहेत कष्ट आणि यातना अपार
अतुल दिवाकर
दिवस रात्र करतो कष्ट, हटत नाही मागे
कष्ट हेच माझे जीवन, जोडती संसाराचे धागे
पोटात दोन घास जाताच सार्थक होई कष्टाचे
नाही काही मोठी आस, नको बंगले मजल्यांचे
मी कामगार,
आपत्तींचा डोंगर जरी उभा समोर
मार्ग काढतो ठेउन, विश्वास मी स्वतःवर
नाही रहात अवलंबून मी इथे कोणावर
जगण्याचा हाच, मंत्र ठेवतो समोर
मी कामगार,
जगतो मी आजमध्ये चिंता नाही उद्याची
उद्या कोणी बघितला,पर्वा कशाला भविष्याची
सुखी समाधानी मी जरी जिंदगी साच्याची
हसतो श्रीमंतांच्या डोळ्यात बघून लकेर काळजीची
मी कामगार,
मर्म बापा जगण्याचे समजले का कोणाला
सार आयुष्याचे समजवायचे आपणच आपणाला
पृथ्वीवर हरेक जण आहे बघ कामगार
प्रत्येकालाच आहेत कष्ट आणि यातना अपार
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment