फक्त तु

फक्त तु

माझे हृदय मी तुला गं कधीच केले send
अन् स्वागतासाठी तुझिया उभा होउन bend
तू टाळिलेस मजला अन् झालो मी विवर्ण
हसून तू पाहता मज भासे लोह ही सुवर्ण।

जसे खोंड आईविना गं बोकाळे माळावरी
तद्वत् चित्त हे माझे नसे गं थार्‍यावरी
देशील का मज हर्ष,जसा श्रावणातील दैवार
पिपासा नसे अर्णवाची, आनंद असे मिळता हिमतुषार ।

अतुल दिवाकर

विवर्ण - फिका पडलेला, रंग गेलेला
खोंड - गाईचे वासरू ( पुल्लिंगी )
बोकाळणे - सैरावरा धावणे
दैवार - थोड्या वेळासाठी आलेला पाऊस
पिपासा - तहान, तृष्णा
अर्णव - महासागर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ