नाते

काही बंधने बंधने नसतात
दोन जीवांची नाती असतात
भावना असतात त्या उस्फूर्त
नका देऊ त्यांना स्वरूप मूर्त

नका बांधू , त्यांना फक्त धाग्यात
नाती जपा, आपल्या हृदयात
नाव नका, देऊ त्यांस
कारण ती असतात, नावातीत खास

आपलेपणाने भांडावे
खोटे खोटे रागवावे
लटके लटके रूसावे
पण भरपूर प्रेम करावे

न बोलता मनातले ओळखावे
आपले प्रतिबिंब डोळ्यात बघावे
सूर कृष्णाच्या बासरीसारखे असावे
नाते असे सुंदर असावे

अतुल दि

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ