भ्रमनिरास
असेच ठरवले कृष्णाने
पृथ्वीवर जाऊन यावे
आपल्या जन्मदिवशी
काय चालले ते पहावे ।।
त्याला दिसले गायींचे कळप
त्यांच्याबरोबर त्यांची वासरे
कृष्णाला वाटले हे छानच झाले
इथे तर गोकुळच अवतरले ।।
जवळून पाहता आश्चर्य वाटले
मोकाट जनावरे असे तिथे लिहिले
धेनू अन् वासरे उकिरड्यात बसले
हे पाहून मन हेलावून गेले ।।
थोडे पुढे त्याला गोपाळ दिसले
त्यांना पाहून त्याचे मन आनंदले
त्यांच्यासमवेत खेळू असे ठरवले
जवळ जाऊन बाळकृष्ण उभे राहिले ।।
पण गोपाळांचे लक्षच नव्हते
हाती मोबाईल नामक खेळणे होते
कँडी क्रॅशचे आवर्तन चालले
बाळकृष्ण ते पाहून बुचकळ्यात पडले ।।
अचानक कानी गोपींचे आवाज आले
पटकन तिथे जावे असे ठरवले
क्षणात कृष्ण तिथे जाउन पोहोचले
वातावरण तेथील होते धुंद झाले ।।
गोपींच्या हाती चिरूट होते
धुरांची वलये आकाशी जात होते
काहींचे पाय थिरकत होते
हे पाहून कृष्ण खिन्न झाले ।।
कृष्णाला काहीच समजेनासे झाले
एक पटले, सर्व आवाक्याबाहेर गेले
लहान थोर सर्व कलियुगाचे झाले
जसे आले तसे कृष्ण परत गेले ।।
अतुल दिवाकर
असेच ठरवले कृष्णाने
पृथ्वीवर जाऊन यावे
आपल्या जन्मदिवशी
काय चालले ते पहावे ।।
त्याला दिसले गायींचे कळप
त्यांच्याबरोबर त्यांची वासरे
कृष्णाला वाटले हे छानच झाले
इथे तर गोकुळच अवतरले ।।
जवळून पाहता आश्चर्य वाटले
मोकाट जनावरे असे तिथे लिहिले
धेनू अन् वासरे उकिरड्यात बसले
हे पाहून मन हेलावून गेले ।।
थोडे पुढे त्याला गोपाळ दिसले
त्यांना पाहून त्याचे मन आनंदले
त्यांच्यासमवेत खेळू असे ठरवले
जवळ जाऊन बाळकृष्ण उभे राहिले ।।
पण गोपाळांचे लक्षच नव्हते
हाती मोबाईल नामक खेळणे होते
कँडी क्रॅशचे आवर्तन चालले
बाळकृष्ण ते पाहून बुचकळ्यात पडले ।।
अचानक कानी गोपींचे आवाज आले
पटकन तिथे जावे असे ठरवले
क्षणात कृष्ण तिथे जाउन पोहोचले
वातावरण तेथील होते धुंद झाले ।।
गोपींच्या हाती चिरूट होते
धुरांची वलये आकाशी जात होते
काहींचे पाय थिरकत होते
हे पाहून कृष्ण खिन्न झाले ।।
कृष्णाला काहीच समजेनासे झाले
एक पटले, सर्व आवाक्याबाहेर गेले
लहान थोर सर्व कलियुगाचे झाले
जसे आले तसे कृष्ण परत गेले ।।
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment