कृपा

करतो वंदन गणराया
भक्त अतुल लागतो पाया
भवानीमाते तुजला नमन
स्मरणे तुझ्या दुःखाचे गमन
नमस्कार तुला गजानना
असू दे कृपा सकल जना

देवा तुझा आशिर्वाद असता
गरीब पामर सिंहासनी बसता
कृपा तुझी झाली माझ्यावरी
लिहू लागतो कविता बरी

तुझ्या कृपेने मला भेटले
सखे सोबती माझ्या शाळेतले
मजला त्यांनी प्रोत्साहन दिले
अन् सुप्त गुण मला सापडले

चित्रे काही रेखाटू शकलो
अक्षरे थोडी जमवू शकलो
जरी हे केले मी माझ्या करे
असशी कर्ता करविता तूच बरे

आज अर्पितो पुष्प शंभरावे
माझ्यावरी लक्ष तुझे असू द्यावे
तुझी कृपा मजवर असेल जर
होईन मी, धन्य खरोखर

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ