मनःस्थिती
हृदयाची धडधड वाढवते
जीवाला घोर लावते
सतत अस्वस्थ करते
वाट पहाणे ।
मन आनंदी होते
जग सुंदर वाटते
हसत रहावेसे वाटते
जेव्हा यश मिळते ।
वेळ खायला उठतो
कामात रस नसतो
प्रगतीचा आलेख खाली जातो
जेव्हा अंगात कंटाळा भरतो ।
डोळे सतत भरून येतात
मनात भावना थैमान घालतात
जगणं नकोसे करून सोडतात
दुःखाचे जेव्हा विचार येतात ।
नाती जपली जातात
बोलणी आपुलकीची असतात
कुटुंब एकत्र असतात
जेव्हा माणसे मायेची असतात ।
अतुल दिवाकर
हृदयाची धडधड वाढवते
जीवाला घोर लावते
सतत अस्वस्थ करते
वाट पहाणे ।
मन आनंदी होते
जग सुंदर वाटते
हसत रहावेसे वाटते
जेव्हा यश मिळते ।
वेळ खायला उठतो
कामात रस नसतो
प्रगतीचा आलेख खाली जातो
जेव्हा अंगात कंटाळा भरतो ।
डोळे सतत भरून येतात
मनात भावना थैमान घालतात
जगणं नकोसे करून सोडतात
दुःखाचे जेव्हा विचार येतात ।
नाती जपली जातात
बोलणी आपुलकीची असतात
कुटुंब एकत्र असतात
जेव्हा माणसे मायेची असतात ।
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment