सोमवार

रविवार नंतर सोमवार
घेतो ओढवून रोष
थंड जातो पडून
लोकांचा कालचा जोष

कालचा उत्साह कालचा आनंद
जातो विरून कुठल्या कुठे
ज्याच्या त्याच्या अंगामधे
कंटाळा कसा भरभरून साठे

पण दोस्ता लक्षात घे
अन् कर थोडा विचार
असायला हवा तुझा आज
खरे म्हणशील तर एकदम जोरदार

मानशील आज जर आनंद
करशील जर उत्साहाने सुरवात
खात्री देतो मी तुला
कंटाळा मग सोडून देईल साथ

अरे सोमवार आहे म्हणून
दुनिया हालते आहे बघ जरा
रविवार जर असते तीन चार
मग चलनवलनाचे तीन तेरा

आजच्या तुझ्या उत्साहावर
आयुष्य तुझे ठरणार आहे
कर हर्षाने स्वागत सोमवारचे
तोच तुला तारणार आहे
तोच तुला तारणार आहे

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ