मी रायपूरवरून जगदलपूरला जात आहे. हा छत्तीसगढचा प्रदेश. भरपूर जंगल. पण आता पाऊस गायब. मातीची घरे. त्यावरून सुचलेली कविता

शेतकरी

छोट्याश्या त्या गावात
मातीचे घर
दारात गायी
कौले छपरावर

परसात खेळतयं
शेतकर्‍याचे पोर
लंगडी, सागरगोटे
मायच्या जीवाला नाही घोर

चुलीवर भाकर्‍या
बडवतीये माय
गोठ्यातल्या दुधाची
जाड जाड साय

घर झालयं
शेणाने सारवून
दारात फुललाय
पारिजातक मोहरून

सुरू झाली लगबग
शेतावर जायची
शेतकर्‍यांना काळजी
धान्य पिकवायची

जर वरूणदेव मेहरबान
तर पिके राहतील ऊभी
नाहीतर जातील
शेतेच्या शेते झोपी

अतुल दिवाकर
10.8.15

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ