ज्ञान

हवेची एक झुळुक
दबकत दबकत आली
मनाला हलकेच
स्पर्शून गेली

थोडासा आनंद
दुःख थोडेसे
बरोबर घेऊन
आली बघ कसे

हसून म्हणाली
का रे तू शांत
बागडायचे सोडून
का शोधतोस एकांत

चल माझ्याबरोबर
तुला जग दाखवते
दुःख म्हणजे काय
व्याख्याच बदलते

मी बघितले जग
म्हणून तुला सांगते
हा क्षण आपला
जगला तोच ज्याला हे कळते

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ