आहेर
तुम्हाला काय वाटते
कालचेच फक्त चांगले होते
अन् आजच्या जगातले
काय फक्त त्रास देते
हो हो खरे आहे
भाजी भाताला चव असते
अहो पण पायाला भिंगरी असता
जाऊ तेथे पोट भरावे तर लागते
आपली भाषा यायलाच हवी
पण आजची गरज, बोला भाषा नवी नवी
जगाच्या सीमा पडल्या गळून
नाविन्याची महती आली कळून
आजीची गोधडी एक नंबर
गोट्या चिंटू सातवे आसमानपर
तरीसुद्धा जीन्सची महती कमी होत नाही
आणि स्मार्टफोनशिवाय दिवस सुरू होत नाही
सारवलेली जमीन अन् मातीची घरे
मनाला भावायचे हे मात्र खरे
पण सिमेंटच्या घरात अन् थंडगार आज A C त
बदललेल्या हवामानात वाटते बरे?
विसरू नको मानवा तुझीच ही करणी
होती पुर्वी तशीच आता आहे धरणी
तू मात्र गेलास आवाक्याच्या बाहेर
म्हणूनच मिळाला तुला हा आहेर
अतुल दिवाकर
तुम्हाला काय वाटते
कालचेच फक्त चांगले होते
अन् आजच्या जगातले
काय फक्त त्रास देते
हो हो खरे आहे
भाजी भाताला चव असते
अहो पण पायाला भिंगरी असता
जाऊ तेथे पोट भरावे तर लागते
आपली भाषा यायलाच हवी
पण आजची गरज, बोला भाषा नवी नवी
जगाच्या सीमा पडल्या गळून
नाविन्याची महती आली कळून
आजीची गोधडी एक नंबर
गोट्या चिंटू सातवे आसमानपर
तरीसुद्धा जीन्सची महती कमी होत नाही
आणि स्मार्टफोनशिवाय दिवस सुरू होत नाही
सारवलेली जमीन अन् मातीची घरे
मनाला भावायचे हे मात्र खरे
पण सिमेंटच्या घरात अन् थंडगार आज A C त
बदललेल्या हवामानात वाटते बरे?
विसरू नको मानवा तुझीच ही करणी
होती पुर्वी तशीच आता आहे धरणी
तू मात्र गेलास आवाक्याच्या बाहेर
म्हणूनच मिळाला तुला हा आहेर
अतुल दिवाकर
Comments
Post a Comment