अपघात

एक असा अपघात
हवा हवासा वाटणारा
रोज रोज घडू दे
मनाला आनंद देणारा

ऑफिसमधून घरी जाता
ट्रॅफिकजॅम नाही रस्त्यात
घडू दे की देवा
रोज असा अपघात

घरी जेव्हा मी येईन
गॅजेट्स नाही घरात
एकमेकांशी बोलतांना
संध्याकाळ जाई आनंदात

आपणहून पहाटे
मुले उठू दे सत्यात
प्रत्यक्ष करू दे व्यायाम
नाही बरं का स्वप्नात

माझ्यातलाच मला
भेटीन का मी रोज
नवीन घेउन एक पहाट
उत्साहात निःसंकोच

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ