मी कोण

रंग माझा शांतीचा
अंग माझे प्रवाही
माझ्याशिवाय बच्चे कंपनीचे
काही खरे नाही
मी कोण?..... दूध

रंग माझे खूप,रूपे माझी अनेक
सजीव निर्जीवांसाठीचे काम मात्र एक
कधी घेतो अंग आकसून,कधी मोकळे सोडून देतो
कधी येतो एकटा, कधी बरोबर मित्रांना आणतो
मी कोण? ..... साबण

अनेक वर्षांचा प्रवास करतो मी क्षणात
शरीर मला नसले तरी आस्तित्व सर्वजणात
मी कोण?...... मन

कोमल माझी त्वचा, दिनकर माझा सखा
ही धरा असे जननी, मी कोण ओळखा.. फुले

माझ्यामुळे तू हसतोस, रडतोस माझ्यामुळे
हे ज्याने जाणिले ते हुशार, बाकी सर्व खुळे
मी कोण.... भावना

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ