आभास

पावसाची सर आली घरंगळत
वाळलेल्या पिकांना ठेवले ओल्यात होरपळत
आपल्या लेकरांवर देवा का तू कोपला
संसार त्यांचे मोडतांना कसा तू झोपला

तुला बोलण्याचा हक्क आहे मला
रागाव तू माझ्यावर काही बोलणार नाही तुला
तुझ्या अशा वागण्याचे काय आहे कारण
नको रे ठेवूस शेतकर्‍यांचे जीव तू तारण

ही परिस्थिती तुला नक्कीच आहे माहीती
का माहीती असूनदेखील करतोस आमची फजिती
कशाचा तू इतका घेतो आहेस बदला
माय ठेउन पोरांची घेऊन गेलास दादला

चूकलो असू आम्ही कर आम्हाला शिक्षा
मार चार छड्या पण पदरात घाल भिक्षा
असाच जर वागत राहिलास तर तुझ्यावर कसा ठेवू विश्वास
तूच आमचा मायबाप हा असेल फक्त आभास

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ