ओळख

ओळख

गवताच्या पात्याची लवचिकता
खोल जाण्याचा स्वभाव मुळांचा
देवा ! होईल का अशी माझी मानसिकता
मनाला होईल का स्पर्श गुणांचा ।

विशालता नभाची वा भरारी गरूडाची
चिकाटी मधमाश्यांची आणि शिस्त मुंग्यांची
बनेल का असा माझा स्वभाव
का राहिल जीवनात ह्यांचा अभाव ।

निरपेक्षता झाडांची अन् चपळता हरिणांची
कठिणता धातूंची, वाहती वृत्ती वार्‍याची
नको पडायला कमतरता, आयुष्यात ह्या गुणांची
वरदान देशील का देवा ! घेशील का काळजी सर्वांची ।

विचार जेवढा करतो मी
माझेच मला कळून चुकले
नाही कोणात ह्यांची कमी
अंगिकारेल तो ज्याने हे ओळखले ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ