जाणीव

अकस्मात आकाशात एक वीज चमकून गेली
घोर काळोख्या अंधारात प्रकाशाचा किरण सोडून गेली
अंधाराला चिरत किरण निघाला अंनंताकडून अनंताकडे
दाट अंधारात उमटले प्रकाशाचे एक कडे।

माणसा! तुझ्या आयुष्यातील अंधारात
जर हवा आहे तुला प्रकाशाचा किरण
विजेसारखा चमकायला हवा तुझाच हात
अन् ठेवायला हवे तू आयुष्य तारण ।

कोणीतरी बदलेल आपले नशीब
चुकीची आहे तुझी ही प्रतिक्षा
बदल आहे बघ तुझ्या समीप
संपवशील जेव्हा तू तुझी तितिक्षा ।

तुझ्या आजमध्येच दडलाय उद्या
कळेल तुला तेव्हा होईल पहाट
अनभिज्ञ राहिलास डोळे मिटून
चालतच राहिल आयुष्याचे चर्‍हाट ।

अतुल

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ