जगण्याचे उद्दिष्ट
जगण्याचे उद्दिष्ट
मला कधी कधी प्रश्न पडतो की आपल्या जगण्याचे उद्दिष्ट काय. आपण पृथ्वीवर का आलो. येथे येऊन आपण काय साध्य करणार आहोत. ना आपण आपल्या मर्जीने येतो ना आपल्या मर्जीने जातो ( अर्थात आत्महत्या करणारे सोडून ). मग आपल्याला येथे धाडण्याचे प्रयोजन काय.
काल सिंधूताई सपकाळांची जीवनगाथा त्यांच्याच तोंडून ऐकायचे भाग्य लाभले. एक बाई असून माईने, हो त्यांना माई म्हणलेलं आवडतं. तर त्या माईने जे साध्य केले आणि अजूनही काही उद्दीष्टे साध्य करायचा त्यांचा जो अविरत प्रयत्न करीत आहे ते ऐकून मी त्यांच्यापुढे नतमस्तक झालो. ती खरचं माऊली आहे. माया , उदारता आणि लीनता याचे मूर्तिमंत उदाहरण. त्यांनी सांगितलेल्या काही प्रसंगात त्यांच्याजागी जर एखादा पुरूष असता तर त्याचा निभाव लागला असता असे मला वाटत नाही. त्याने केव्हाच गाशा गुंडाळला असता. मला सांगा ना, समोर प्रेत जळत असतांना त्यावर आपले जेवण तुमच्या माझ्यासारख्या माणसाने केले असते का? आणि जरी एखादा तेवढा धीट असता तरी त्याने एकट्याने त्या अंधार्या स्मशानात ते खाल्ले असते का?
प्रत्येकाच्या आयुष्यात नक्कीच असे प्रसंग येतात की त्याला दुसर्याच्या मदतीशिवाय पुढे जाता येत नाही किंवा तो अथवा ती एखादे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी दुसर्याच्या मदतीची अपेक्षा करतात. पण हीच स्थिती जेव्हा उलटी असते, म्हणजे त्याच्या किंवा तिच्या मदतीची अपेक्षा दुसर्यांना असते तेव्हा ते तितक्याच आत्मियतेने मदत करतात का? मला वाटते आपण प्रत्येकाने ह्या प्रश्नाचे उत्तर होकारार्थी होईल यासाठी प्रयत्न करावयास हवेत.
आपण जर स्वतःसाठी जगलो तर आपल्याला आनंद नक्कीच मिळतो पण तो क्षणभंगुर असतो आणि दुसर्याच्या आनंदासाठी जर आपण जगलो तर मिळणारा आनंद चिरकाल टिकतो. आयुष्य समाधानी होते. आपल्या जगण्याचे कदाचित हेच उद्दिष्ट असावे. तुम्हाला काय वाटते?
अतुल दिवाकर
18.2.16

Comments
Post a Comment