विनंती

विनंती

लोकांनी मला या कितीतरी छळलं
सरळ माझा स्वभाव नाही त्यांना कळलं
मी पडलो साधा मला कपट नाही कळलं
जिवंतपणीच मला ह्या लोकांनी जाळलं

जाऊ कुठे मी माझीच घेउन राख
माझ्यापेक्षाही हे लोक आहेत चलाख
राखेलासुद्धा ते करतील बेचिराख
मी कोण, ह्या जगालाच हे करतील खाक

मायबाप सरकार ते ही उलटले
मदत करू म्हणत नेते मागे हटले
गरीबाला इथे नाही कोणीच वाली
बदलेल नशीब आशेवर पिढी संपून गेली

कोणावर मी आता ठेवावा भरवसा
संपून गेले अश्रू झाला जीव वेडापिसा
वाळून गेले रक्त राहिले प्राणहीन शरीर
देवा तू तरी आता देशील का मला धीर

सर्वस्व गमावलेला शेतकरी

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ