निर्णय

निर्णय

शहरातले डांबरी रस्ते
लोकांचे जीव किती सस्ते
गाडीतून आनंदात फिरतात श्वान
अन् माणसांना रहायला फुटपाथचा मान
जगणे घड्याळ्याच्या काट्यावरती
रोजचीच होते दमछाक पुरती
सिमेंटचे जंगल आणि बाटलीतले पाणी
विज नसेल तर आणिबाणी
प्रत्येकाचे असते स्वतःचे विश्व
तोंडदेखली नाती अन् भावना शुष्क
कमाई मोजतात पैशामध्ये
माणसाची किंमत कवडीमध्ये ।

गावाकडे माझ्या पायवाटीचा रस्ता
आपला वाटतो, येउन बघ दोस्ता
जनावरांना मिळतो माणसाचा मान
सर्जा आणि राजाची वेगळीच शान
गळ्यात घुंघुरमाळा अन् शिंगांना रंग
पाहून त्या दोघांना होशील तू दंग
वरूणराजावर मात्र सर्वांची भिस्त
रागावला तो तर जीवन होते स्वस्त
लई जीव लावते माझी काळी माय
गाईच्या दुधाची जाड जाड साय
मातीची घरे आहेत शेणाने सारवलेली
घरातली माणसे भावनेने ओथंबलेली
आनंदात करतो इथे प्रत्येकजण कष्ट
एकमेकांवर माणसे नाही होत रूष्ट
जरूरीपुरतीच किंमत पैशाला
नात्यात किंमत असते भावनेला ।

एकीकडे पैसा तर दुसरीकडे नाती
आरामदायी जीवन वा कष्ट अती
ठरव तूच गावाकडे जायचे
का शहरात माणसाला माणसासारखे वागवायचे ।

अतुल दिवाकर

Comments

Popular posts from this blog

चारोळी

आयुष्यरुपी भेळ